राखीपौर्णिमेला जुळून येतोय सर्वार्थ सिद्धी आणि आयुष्यमान योग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 09:48 PM2020-07-27T21:48:39+5:302020-07-27T21:51:10+5:30
यंदा ३ ऑगस्ट रोजी राखीपौर्णिमा साजरी होणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासानुसार या दिवशी सर्वार्थ सिद्धी आणि दीर्घायू आयुष्यमान योग जुळून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यंदा ३ ऑगस्ट रोजी राखीपौर्णिमा साजरी होणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासानुसार या दिवशी सर्वार्थ सिद्धी आणि दीर्घायू आयुष्यमान योग जुळून येत आहे.
ज्योतिषाचार्य पं. उमेश तिवारी यांच्या म्हणण्यानुसार, भद्रा नक्षत्राची समाप्ती सकाळीच होत असल्याने, या दिवशी दिवसभर बहिणी आपल्या भावांना बिनधास्त राखी बांधू शकणार आहेत. विशेष म्हणजे २९ वर्षानंतर राखीपौर्णिमेला असा शुभयोग जुळून येत आहे. भद्रा आणि ग्रहणाचे सावट नसल्याने यंदाचे रक्षाबंधन शुभयोगात साजरे होणार आहे.
शुभ मुहूर्त
राखी बांधण्याचा मुहूर्त : सकाळी ९.२७ ते रात्री ९.११ पर्यंत.
उत्तम मुहूर्त : सकाळी ९.२७ ते १०.३० पर्यंत व दुपारी १.४५ ते ४.२३ पर्यंत.
प्रदोष मुहूर्त : संध्याकाळी ७.०१ ते रात्री ९.११ पर्यंत.
मुहूर्त अवधी : एकूण ११ तास ४३ मिनिटे.
असा आहे शुभ संयोग
या वर्षी रक्षाबंधनाला सर्वार्थसिद्धी आणि दीर्घायू आयुष्यमान योगासह सूर्य शनिचा समसप्तक योग, सोमवती पौर्णिमा, मकरचा चंद्रमा, श्रवण नक्षत्र, उत्तराषाढ नक्षत्र आणि प्रीती योग जुळून येत आहे. असा संयोग यापूर्वी १९९१ साली जुळून आला होता. या संयोगाला कृषी क्षेत्रासाठी विशेष लाभदायक मानले जाते.