नागपूर : रिफाईंड तेलामुळे चरबी वाढत असल्याने आता लाकडी घाण्यावरील कच्च्या घाणीच्या तेलाचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. या तेलात रसायनांचा व अग्निचा वापर होत नसल्याने हे नैसर्गिक आहे. त्यामुळे अनेकांचा कल याकडे वाढल्याचे दिसत आहे.
तेल हा सर्वच घरांमध्ये स्वयंपाकातला महत्त्वाचा घटक आहे. पण आरोग्याचा विचार करता तेल अतिप्रमाणात खाणे, चुकीच्या पद्धतीने स्वयंपाकासाठी तेल वापरणे, हॉटेलमधील तळलेले पदार्थ वारंवार खाणे, घट्ट आलेले ते वापरणे, अधिक दिवसाचे घाणीचे तेल वापरणे या सगळ्याच गोष्टी अपायकारक ठरतात. त्यामुळे खवय्येगिरी आवरून आहारामध्ये मोजून मापूनच तेलाचा वापर योग्य असल्याचे आहारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
...
म्हणून वाढत आहेत हृदयरोगी
तेलाचा अतिवापर करणे आरोग्यासाठी घातकच आहे. अलीकडे घाणीच्या तेलाचा अधिक वापर करणारे हृदयरुग्ण वाढल्याचे डॉक्टरांचे निरीक्षण आहे. बदलून तेलाचा आहारात वापर न करता एकच एक तेल सातत्याने वापरले जाते. त्यामुळे एकप्रकारचे घटक तेलातून मिळते. बदलती जीवनशैली, जंक फूड हे सुद्धा यामागील कारण आहे.
...
लाकडी घाण्याच्या तेलाचा पर्याय
नागपुरात साधारण २० ते ३० वर्षांपूर्वी घाणीवरूनच तेल आणले जायचे. दरम्यानच्या काळात विविध कंपन्यांचे रिफार्ईंड तेल बाजारात आले. ते स्वस्त असल्याने घाणीच्या तेलाची मागणी घटली. परिणामी, अनेक घाण्या बंद पडल्या. सध्या नागपुरात चार ते पाच घाणी आहेत. तर ग्रामीण भागात कळमेश्वर, काटोल या तालुक्यातही तेलघाणी आहेत.
...
रिफाईंड तेल घातक का?
रिफाईंड तेल अजिबात घातक नाही. ते आहारातील समतोल राखते. मात्र अतिप्रमाणात तेलाचा वापर आहारात करणे धोक्याचेच आहे. घाणीच्या तेलामध्ये कोलेस्ट्रॉल अधिक असल्याने त्याचाही वापर मर्यादित हवा.
- डॉ. सुहास कानफाडे, नागपूर
...
आहारतज्ज्ञ काय म्हणतात?
रसायनांचा व अग्निचा वापर नसल्याने गुणकारी आहे. मात्र अधिक प्रमाणात वापर नको, मर्यादित हवा. घाणीचे तेल ताजे वापरा, घट्ट आलेले हृदयासाठी धोकादायक असते. तेल बदलून रोटेशनमध्ये वापरा. वारंवार गरम केलेले तेल वापरू नका.
- कविता गुप्ता, आहारतज्ज्ञ
...