नासुप्र शहरातील अनधिकृत बांधकाम नियमित करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 12:51 AM2018-04-05T00:51:30+5:302018-04-05T00:51:40+5:30

नागपूर शहरातील अनधिकृत बांधकाम नियमित क रण्यात येणार आहे. यात बांधकाम करताना नियमानुसार पार्किंगची जागा तसेच मोकळी जागा न सोडलेल्या इमारती नियमित करण्यात येणार आहे. याला ३१ आॅक्टोबर २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय नासुप्रने घेतला आहे.

Regarding the unauthorized construction of NIT will regularise | नासुप्र शहरातील अनधिकृत बांधकाम नियमित करणार

नासुप्र शहरातील अनधिकृत बांधकाम नियमित करणार

Next
ठळक मुद्दे३१ आॅक्टोबर २०१८ पर्यंत अर्जाला मुदत : पार्किंगची जागा न सोडलेल्यांनाही संधी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरातील अनधिकृत बांधकाम नियमित क रण्यात येणार आहे. यात बांधकाम करताना नियमानुसार पार्किंगची जागा तसेच मोकळी जागा न सोडलेल्या इमारती नियमित करण्यात येणार आहे. याला ३१ आॅक्टोबर २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय नासुप्रने घेतला आहे.
महाराष्ट्र शासनाने ७ आॅक्टोबर २०१७ रोजी महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना(प्रशामित संरचना)२०१७ पासून अंमलात आणली आहे. त्याअंतर्गत ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीचे अनधिकृत विकास बांधकाम आणि भूखंड, अभिन्यास नियमितीकरण(प्रशमन संरचना)करून घेण्याकरिता ६ एप्रिल २०१८ पर्यंत दिलेली मुदत ३१ आॅक्टोबर २०१८ पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यानुसार नासुप्रनेही हा निर्णय घेतला आहे.
कलम ५२(क)अंतर्गत प्रशमन करून घेण्याकरिता नासुप्रद्वारे नागरिक तसेच विकासकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. ज्यांनी ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीचे बिनामंजुरी विकास, भूखंडके, अभिन्यास व बांधकामे केली आहेत, त्यांच्याकरिता आता ही मुदतवाढ वाढविण्यात आली आहे. याचा नागरिक आणि विकासकांनी नोंद घ्यावी तसेच या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नासुप्रने नागरिकांना केले आहे.
पाच हजार नागरिकांना लाभ होणार
नासुप्रने अनियमित बांधकाम नियमित करण्याला मुदतवाढ दिल्याने याचा शहरातील पाच हजाराहून अधिक नागरिकांना व विकासकांना लाभ होणार आहे. यात एफएसआय वाढलेला असला तरी या योजनेचा लाभ मिळणार आहे. १९०० व ५७२ ले-आऊ टव्यतिरिक्त नागपूर शहरातील अनधिकृत बांधकामांना याचा लाभ मिळणार आहे.
मंजुरीची खात्री करूनच खरेदी करा
महापालिका क्षेत्रात संबंधित प्राधिकरणाची मंजुरी प्राप्त असल्याची शहानिशा करूनच भूखंड वा सदनिका खरेदी-विक्री कराव्यात. तसेच बांधकामांना आरंभ प्रमाणपत्र प्राप्त असून बांधकाम परवानगीनुसार होत असल्याची खात्री करून घ्यावी. तसेच गाळे, सदनिका खरेदी करताना विकासकांकडून भोगवटा प्रमाणपत्राची मागणी करावी, असे आवाहन नासुप्रने केले आहे.

Web Title: Regarding the unauthorized construction of NIT will regularise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.