लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अकरावीच्या प्रवेशाची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना १ ऑगस्टपर्यंत नोंदणी करायची आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा या प्रक्रियेला उशीर झाला आहे.दरवर्षी दहावीचा निकाल जून महिन्यात लागतो. त्यामुळे अकरावीच्या प्रवेशास जून महिन्यातच सुरुवात होते. गेल्या तीन वर्षापासून राज्यभरात अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात येत असल्याने या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी राज्यात सर्व शाळांतील विद्यार्थ्यांकडून अर्जाचा पहिला टप्पा भरून घेतला जातो. निकालानंतर अर्जाचा दुसरा टप्पा भरण्यात येतो. यानंतर समितीमार्फत अकरावीच्या प्रवेशाची यादी टक्केवारीच्या आधारावर प्रकाशित करून महाविद्यालयांना जागेचे अलॉटमेंट करण्यात येते. १ जुलैपासून कनिष्ठ महाविद्यालयांना नोंदणी करायची होती. शहरात जवळपास २१५ कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली आहे. त्यानुसार शहरात अकरावीच्या ५८,७६० जागा आहेत.शाखानिहाय जागाविज्ञान - २७,२९०वाणिज्य - १७,८८०कला - ९,४६०एमसीव्हीसी - ४,१३०विद्यार्थ्यांसाठी २९ सुविधा केंद्रकेंद्रीय बोर्डाचे दहावीचे निकाल लागले आहेत. या विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी केंद्रीय प्रवेश समितीने २९ सुविधा केंद्र सुरू केली आहेत.समिती सदस्यांचा ऑनलाईनला विरोधगेल्यावर्षी शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांच्या २१००० जागा रिक्त होत्या. ही प्रक्रिया फक्त महापालिकेच्या हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयांमध्येच राबविण्यात येत असल्याने शहर सीमेला लागून असलेले स्वयंअर्थ सहाय्यित व विना अनुदानित महाविद्यालयांमध्ये ट्यूशन क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थी प्रवेश घेतात. त्याचा परिणाम शहरातील महाविद्यालयांवर होतो. त्यामुळे ही प्रक्रिया संपूर्ण जिल्हाभर राबविण्यात यावी अथवा शहरातूनही रद्द करावी, अशी मागणी कें द्रीय प्रवेश समितीच्या सदस्यांनी केली आहे. यासंदर्भात न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली आहे.
नागपुरात अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी नोंदणी सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 8:56 PM
अकरावीच्या प्रवेशाची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना १ ऑगस्टपर्यंत नोंदणी करायची आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा या प्रक्रियेला उशीर झाला आहे.
ठळक मुद्दे१ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना भरायचाय ऑनलाईन फॉर्म : शहरात ५८,७६० जागा