३० जूनपर्यंत धावणार नाहीत नियमित प्रवासी रेल्वेगाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 01:11 AM2020-05-15T01:11:02+5:302020-05-15T01:13:27+5:30
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वे आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेसह इतर सर्व विभागातील एक्स्प्रेस, मेमू, लोकल आणि पॅसेंजर रेल्वेगाड्या ३० जूनपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वे आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेसह इतर सर्व विभागातील एक्स्प्रेस, मेमू, लोकल आणि पॅसेंजर रेल्वेगाड्या ३० जूनपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सुविधेकडे लक्ष देऊन रद्द केलेल्या सर्व रेल्वेगाड्यातील प्रवाशांना त्यांच्या तिकिटांची १०० टक्के रक्कम परत मिळणार आहे. १२ मे पासून रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वेगाड्यांची वाहतुक सुरू केली आहे. लॉकडाऊनमुळे जागोजागी अडकलेले नागरिक आणि कामगारांसाठी या विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतीय रेल्वेत २२ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले होते. तेंव्हापासून नियमित प्रवासी रेल्वेगाड्या बंद आहेत. केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी मालगाडी आणि विशेष पार्सल रेल्वेगाड्या तसेच कामगारांसाठी श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्या व दिल्लीवरुन १५ शहरांसाठी विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत.