लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मूळचे अमरावती जिल्ह्यातील नेर पिंगळाईचे आणि नंतर नागपुरातच स्थायिक झालेले प्रख्यात चित्रकार वसंत चव्हाण यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते.वसंत चव्हाण यांनी मुंबईतील जेजे आर्टस् येथून चित्रकारितेचे शिक्षण सुवर्णपदकासह पूर्ण केल्यानंतर १९६० मध्ये नागपुरात आले. तेव्हापासून अंतिम श्वासापर्यंत त्यांचे वास्तव्य नागपुरातच होते. गांधीसागर, टिळक पुतळा येथील विजय भारत लॉजमधील १० बाय १० ची एक रूम आणि वसंत चव्हाण, असे जणू समीकरणच झाले होते. १९८४-८५ मध्ये नागपुरात भरलेल्या विश्व हिंदी संमेलनातील त्यांच्या चित्राने प्रचंड चर्चा घडवून आणली होती. नागपूर नगरीचे उत्कृष्ट चित्रकार म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांना वृत्तपत्रीय लेख संग्रह करण्याचा छंद होता. साहित्यप्रेमी आणि वाचनप्रेमी म्हणून सर्वदूर परिचित असणारे वसंत चव्हाण यांनी आपल्या कलेसंदर्भात कधीच तडजोड केली नाही. एक अवलिया चित्रकार म्हणूनच त्यांच्याकडे बघितले जात असे आणि त्यांच्या हाताचा स्पर्श म्हणजे ते चित्र अधिक खुलते, अशी भावना त्यांच्याविषयी कलाक्षेत्रात होती.
नागपुरातील प्रख्यात चित्रकार वसंत चव्हाण यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2020 11:52 AM
मूळचे अमरावती जिल्ह्यातील नेर पिंगळाईचे आणि नंतर नागपुरातच स्थायिक झालेले प्रख्यात चित्रकार वसंत चव्हाण यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते.
ठळक मुद्दे लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी वसंत चव्हाण यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. चव्हाण हे लोकमत परिवाराशी जुळलेले होते. त्यांची उणीव नेहमी जाणवत राहील, एक प्रतिभावंत कलावंत आपण साऱ्यांनी गमावला आहे, अशा शब्दात दर्डा य