नागपुरात काँग्रेसला बळकट करण्याचा संकल्प 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 11:36 PM2018-03-13T23:36:53+5:302018-03-13T23:37:04+5:30

निवडणुका का हरलो याची कारणमीमांसा व्हावी, कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा, तसेच आजच्या आधुनिक युगात सोशल मीडिया व मौखिक जाहिरातीवर अधिक भर देण्यात यावा, काँग्रेसने केलेल्या विविध कामांची माहिती तळागाळातील लोकांपर्यत पोहचली पाहिजे, यासाठी जिल्हास्तरावर प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करून काँग्रेसला बळकट करण्याचा संकल्प देवडिया काँग्रेस भवन येथे आयोजित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती उपसमितीच्या बैठकीत करण्यात आला.

The resolution to strengthen the Congress in Nagpur | नागपुरात काँग्रेसला बळकट करण्याचा संकल्प 

नागपुरात काँग्रेसला बळकट करण्याचा संकल्प 

Next
ठळक मुद्देपदाधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिर : पक्षकार्यालयात अनुसूचित जाती उपसमितीची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निवडणुका का हरलो याची कारणमीमांसा व्हावी, कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा, तसेच आजच्या आधुनिक युगात सोशल मीडिया व मौखिक जाहिरातीवर अधिक भर देण्यात यावा, काँग्रेसने केलेल्या विविध कामांची माहिती तळागाळातील लोकांपर्यत पोहचली पाहिजे, यासाठी जिल्हास्तरावर प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करून काँग्रेसला बळकट करण्याचा संकल्प देवडिया काँग्रेस भवन येथे आयोजित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती उपसमितीच्या बैठकीत करण्यात आला.
शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकासजी ठाकरे अध्यक्षस्थानी होते. अनुसूचित जाती उपसमितीचे अध्यक्ष किशोर गजभिये यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अनुसूचित जाती, जमाती मतदार संघात काँग्रेसचा पराभव का झाला, काँग्रेसच्या उमेदवारांना एकट्याच्या बळावर निवडणूक का लढावी लागते, अशा विषयांवर मंथन झाले पाहिजे, असे मत किशोर गजभिये यांनी मांडले. नियोजनपूर्वक निवडणुकांना सामोरे गेलो तर काँग्रेसला कोणतीही निवडणूक जिंकणे कठीण नाही. यासाठी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करून शेतकरी, शेतमजूर, यांच्यावर होत असलेले अन्याय, देशापुढील आव्हाने,काँग्रेसची स्थापना व देशाच्या विकासातील योगदान याची माहिती सर्वसामान्यांना करून देण्याचा संकल्प करण्यात आला.
व्यासपीठावर अनु.जाती उपसमितीचे सदस्य कृष्णकुमार शेंडे, सुरेश भोयर,शकुर नागाणी,अतुल लोढे, उमाकांत अग्निहोत्री, विशाल मुत्तेमवार,रमण पैगवार,बंडोपंत टेंभुर्णे,डॉ.गजराज हटेवार,जयंत लुटे, प्रा.दिनेश बानाबाकोडे,अनु.जाती शहर अध्यक्ष विवेक निकोसे, मनोज सांगोळे, रमेश पुणेकर, प्रशांत धवड,नितीन साठवणे आदी उपस्थित होते.
प्रारंभी विकास ठाकरे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. कार्यक्रमाचे संचालन महामंत्री डॉ.गजराज हटेवार यांनी केले आणि आभार अनु.जाती समितीचे भाऊराव कोकणे यांनी मानले. यावेळी अण्णाजी राऊ त, अशरफ खान, अ‍ॅड. अक्षय समर्थ, स्नेहल दहीकर, रश्मी धुर्वे, पंकज थोरात,अशरफ खान, चंद्रकांत बडगे, महेश श्रीवास, विलास भालेकर, मिलिंद सोनटक्के, वासुदेव ढोके, अर्चना बडोले,मालिनी खोब्रागडे, सूरज आवळे, अतिक कुरैशी, अशरफ खान, धरमकुमार पाटील, सुधीर जाधव,बॉबी दहिवाले,दर्शनी धवड अंबादास गोडाणे, भास्कर चाफले,उज्ज्वला बनकर,नितीन बन्सोड, अनिल मेश्राम,ओमप्रकाश मोहोतो, राजेश कुंभलकर,संजय झाडे, रवी गाडगे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रारंभी माजीमंत्री पतंगराव कदम यांना आदरांजली वाहण्यात आली.

Web Title: The resolution to strengthen the Congress in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.