शेतकरी, नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवा

By admin | Published: May 25, 2017 01:45 AM2017-05-25T01:45:28+5:302017-05-25T01:45:28+5:30

ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करून ते गावकऱ्यांना सहज उपलब्ध करून द्यावे, जलयुक्त शिवार योजनेची कामे, ...

Resolve the problem of farmers, citizens | शेतकरी, नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवा

शेतकरी, नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवा

Next

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे : वार्षिक आमसभेचे आयोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करून ते गावकऱ्यांना सहज उपलब्ध करून द्यावे, जलयुक्त शिवार योजनेची कामे, ग्रामविकासाची कामे तातडीने पूर्ण करावीत व कृषी विभागाशी संबंधित छायाचित्रे काढून शासनाला तातडीने सुपूर्द करून पूर्ण झालेल्या कामांचे सरपंचाकडून प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
खापरी येथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी, महसूल, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, पाणीपुरवठा, भूमी अभिलेख, विद्युत पारेषण, महिला व बालकल्याण आदी विभागातील मंजूर कामे तसेच राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांसंदर्भात वार्षिक आमसभेत आढावा घेण्यात आला. यावेळी जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, उपाध्यक्ष शरद डोणेकर, सदस्य रूपराव शिंगणे, शुभांगी गायधने, पं.स. नागपूरच्या सभापती नम्रता राऊत, उपसभापती सुजित नितनवरे उपस्थित होते. कृषी अधिकाऱ्यांनी नागपूर तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत शेतकऱ्यांची जाहीर सभा घ्यावी. यामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या, भौगोलिक परिस्थिती, पाण्याची समस्या, पिकांची माहिती शेतकऱ्यांकडून जाणून घ्यावी. याकरिता कृषी अधिकाऱ्यांना जाहीर सभा घेण्याचा सूचना दिल्या. तसेच जलयुक्त शिवार अभियानाबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी गंभीरतेने व तातडीने कामे पूर्ण करावीत अन्यथा कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पालकमंत्र्यांनी दिला. यावेळी त्यांनी आरोग्य विभागातील योजनांचा आढावा घेतला.
नागपूर तालुक्यातील रस्त्यांची कामे उत्कृष्ट दर्जाची करण्यात यावी. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत तसेच सुरू असलेली कामे एक महिन्याच्या आत पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री बावनकुळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या. रस्त्यांचे बांधकाम करतेवेळी मुख्य अभियंता व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळी हजर राहावे, अशा सूचना केल्या. भूमिअभिलेख विभागातील शेतकऱ्यांसाठी योजनांचा आढावा घेतला.
ग्रामीण भागापर्यंत सर्वांना वीज पुरवठा करण्यासाठी नागपूर तालुक्यामध्ये अनेक कामे सुरू आहेत. सदर कामे जलदगतीने पूर्ण करावीत. तसेच वीजसंबंधी सर्व समस्या दूर करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. विजेसंबंधी ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी ग्रामपंचायतमध्ये सहा महिने ग्राहक मेळाव्याचे आयोजन विद्युत पारेषण विभागाने करावे. यावेळी नागपूर तालुक्यातील शासनाच्या विविध विभागातील अधिकारी तसेच ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Resolve the problem of farmers, citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.