ब्रॅण्डेड गारमेंटच्या वार्षिक सेलला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:12 AM2021-02-21T04:12:23+5:302021-02-21T04:12:23+5:30

नागपूर : इंटरनॅशनल गारमेंटची निर्यात करणाऱ्या नामांकित ब्रॅण्डेड गारमेंट कंपनीचा वार्षिक सेल चिटणविस सेंटर, सिव्हील लाईन्स येथे सुरू असून, ...

Response to the annual sale of branded garments | ब्रॅण्डेड गारमेंटच्या वार्षिक सेलला प्रतिसाद

ब्रॅण्डेड गारमेंटच्या वार्षिक सेलला प्रतिसाद

Next

नागपूर : इंटरनॅशनल गारमेंटची निर्यात करणाऱ्या नामांकित ब्रॅण्डेड गारमेंट कंपनीचा वार्षिक सेल चिटणविस सेंटर, सिव्हील लाईन्स येथे सुरू असून, ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वार्षिक सेलचे आयोजन दोन वर्षांनंतर नागपुरात करण्यात आले आहे. सेलमध्ये सर्व नवीन ब्रॅण्डेड गारमेंटवर ९० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येत आहे. सेल केवळ तीन दिवसांसाठी आहे.

सेलमध्ये पुरुष, महिला आणि लहानांसाठी ब्रॅण्डेड जीन्स, ट्राऊझर, १०० टक्के कॉटन शर्ट, टी-शर्ट, जॅकेट, बरमुडा, फॅन्सी थ्री फोर्थ, टॉप, प्लाझो, फ्रॉक, पॅन्ट, जीन्स पॅन्ट, कुर्ती, लेडिज ऑफिसवेअर आणि फॅशनेबल वस्त्रांच्या हजारो व्हरायटीज आहे. याशिवाय अनेक डिझाईन आणि आकर्षक फेस्टिव्ह स्टॉकचा मोठा साठा आहे. याशिवाय उच्च श्रेणीचे इंटरनॅशनल क्वालिटीच्या फेस्टिव्ह व वेडिंग कलेक्शनमध्ये पुरुष, महिला आणि लहानांचे वस्त्र फारच कमी किमतीत आहेत.

तीन दिवसांचा वार्षिक सेल प्रत्येक वर्षी भारतात कोणत्याही एका शहरात लावण्यात येतो. दोन वर्षांपूर्वी नागपूरकरांच्या मिळालेल्या प्रतिसादामुळे यंदा पुन्हा सेलचे आयोजन केले आहे. पुरुष, महिला आणि लहानांसाठी रेडिमेड गारमेंटचे अनोखे व आकर्षक कलेक्शन सेलमध्ये आहेत. हे कलेक्शन सर्वांच्या पसंतीस खरे उतरणारे आहेत. याशिवाय ९० टक्के सवलतीमुळे ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होत आहे. सेलमध्ये ग्राहकांनी खरेदी करावी, असे आयोजकांनी म्हटले आहे. (वा.प्र.)

Web Title: Response to the annual sale of branded garments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.