वन उपजाच्या लिलावाला वनमजूर सोसायट्यांचा प्रतिसाद अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:07 AM2020-12-08T04:07:17+5:302020-12-08T04:07:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वनविभागाच्या वतीने दरवर्षी वन उपजाचा लिलाव होतो. यात टिंबर आणि जळाऊ लाकडातून वनविभागाला मोठा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वनविभागाच्या वतीने दरवर्षी वन उपजाचा लिलाव होतो. यात टिंबर आणि जळाऊ लाकडातून वनविभागाला मोठा महसूल मिळतो. हा महसूल मिळून देण्यात वनमजूर सहकारी सोसायट्यांचा (फॉरेस्ट लेबर को-ऑपरेटिव्ह सोसायटी) वाटा नागपूर जिल्ह्यात अधिक राहिला आहे. शासकीय आणि आदिवासी विकास संस्थांच्या तुलनेत वनमजूर सोसायट्यांकडून मागील तीन वर्षात झालेली खरेदी अधिक आहे.
वनामधून दरवर्षी टिंबर लिलावात काढले जाते. यात जळाऊ बिटांचाही समावेश असतो. नियमानुसार शासकीय एजन्सी, आदिवासी संस्था आणि वनमजूर सहकारी संस्थांच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबविली जाते. मागील तीन वर्षांच्या काळामध्ये या लिलाव प्रक्रियेत वनमजूर सहकारी संस्थांनी अधिक सहभाग घेतला. २०१८, २०१९ आणि सध्याच्या नोव्हेंबर-२०२० पर्यंत झालेल्या लिलावात वनमजूर संस्थांकडून ५,१८९.७३७ क्युबिक मीटर टिंबर लिलावातून खरेदी करण्यात आले. यातून वनविभागाला १४ कोटी ९९ लाख ३७ हजार ४४० रुपयांचा महसूल मिळाला. तर या तीन वर्षात झालेल्या जळाऊ एकूण बिटांच्या लिलावातून ११,९७९.५ युनिट बिट खरेदी केले. यातून ६ कोटी ४४ लाख ११ हजार ८० रुपयांचा महसूल वनविभागाला प्राप्त झाला.
...
काही बिटांचे लिलाव पुन्हा लवकरच काढले जाणार आहेत. पावसाळ्यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. अधिकाधिक महसूल वनविभागाला मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. वनमजूर सहकारी संस्थांचा यात चांगला सहभाग आहे.
- प्रभूनाथ शुक्ल, उपवनसंरक्ष, नागपूर
...
अशी आहे लिलावातील आकडेवारी टिंबर जळाऊ
एजन्सी वर्ष क्यु. मीटर विक्री किंमत बिट विक्री किंमत शासकीय २०१८ १७३.२०१ ४२,२४,२७० ३०१ ९,११,१९०
२०१९ १४६.१५७ २४,९२,६२० १५३.७५ २,९३,३१०
२०२० १२७.१८९ २४,१५,२१० १०३.९ २,९२,४४०
एकूण ४४६.५४७ ९१,३२,१०० ५५८.६५ १४,९६,९४०
आदिवासी २०१८ २४३.००९ ७६,३१,२०० १७९ ९,७९,१५०
२०१९ ३०३.३४६ ७५,६७,६५० १५३.३५ ४,३५,५००
२०२० २६७.४९५ १,०३,४९,०७० १११.७५ ५,५८,९१०
एकूण ८१३.८५ २,५५,४७,९२० ४२६.१ १९,७३,५६०
एफएलसीएस २०१८ १,३६२.४१६ ३,९७,३२,१०० १,७६४ १,०९,१४,५२०
२०१९ १,५३५.२११ ४,०४,५७,७६० ४,३०१.५ १,८०,३३,५८०
२०२० २,२९२.११ ६,९७,४७,५८० ५,९१४ ३,५४,६२,९८०
एकूण ५,१८९.७३७ १४,९९,३७,४४० ११,९७९.५ ६,४४,११,०८०
...