रिवा-इतवारी विशेष रेल्वेगाडीचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:11 AM2021-02-21T04:11:58+5:302021-02-21T04:11:58+5:30

नागपूर : रिवा-इतवारी-रिवा आणि जबलपूर-चांदाफोर्ट-जबलपूर दरम्यान त्रिसाप्ताहिक स्पेशल रेल्वेगाडीचा शुभारंभ रविवारी २१ फेब्रुवारीला दुपारी ४.३० वाजता रेल्वेमंत्री पीयूष गोयल ...

Riva-Itwari special train launched | रिवा-इतवारी विशेष रेल्वेगाडीचा शुभारंभ

रिवा-इतवारी विशेष रेल्वेगाडीचा शुभारंभ

googlenewsNext

नागपूर : रिवा-इतवारी-रिवा आणि जबलपूर-चांदाफोर्ट-जबलपूर दरम्यान त्रिसाप्ताहिक स्पेशल रेल्वेगाडीचा शुभारंभ रविवारी २१ फेब्रुवारीला दुपारी ४.३० वाजता रेल्वेमंत्री पीयूष गोयल दिल्लीवरून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करणार आहेत.

रिवा रेल्वेस्थानकावरून विशेष वेळापत्रकानुसार ०१५७४ रिवा-इतवारी एक्स्प्रेस रेल्वेगाडीचा शुभारंभ होणार आहे. ही गाडी रिवा स्थानकावरून दुपारी ४.३० वाजता सुटून सायंकाळी ६ वाजता सतना, ६.३० वाजता मेहर, ७.३० वाजता कटनी, ९.१० वाजता जबलपूर, रात्री १.४० वाजता नैनपूर, गोंदिया ४.४५ वाजता आणि इतवारीला सकाळी ६.५० वाजता येणार आहे. रेल्वेगाडी क्रमांक ०२२७४ जबलपूर-चांदाफोर्ट विशेष रेल्वेगाडी विशेष वेळापत्रकानुसार चालविण्यात येणार आहे. ही गाडी जबलपूरवरून दुपारी ४.३० वाजता सुटून गोंदियाला रात्री ९.५५ आणि चांदाफोर्टला रात्री १ वाजता पोहोचणार आहे.

............

नव्या गाड्यांचे वेळापत्रक

०१५७४ रिवा-इतवारी एक्स्प्रेस विशेष गाडी नियमितपणे सायंकाळी ५.३० वाजता (सोमवार, बुधवार, शनिवार) रिवावरून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ७.२५ वाजता (मंगळवार, गुरुवार, रविवार) इतवारीला पोहोचेल. रेल्वेगाडी क्रमांक ०१७५३ इतवारी-रिवा विशेष रेल्वेगाडी इतवारीवरून सकाळी ८.२० वाजता (बुधवार, शुक्रवार, सोमवार) रवाना होऊन दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता (मंगळवार, गुरुवार, रविवार) रिवाला पोहोचेल. ही गाडी सतना, मेहर, कटनी, जबलपूर, नैनपूर, गोंदियात थांबेल. त्याचप्रमाणे रेल्वेगाडी क्रमांक ०२२७४ जबलपूर-चांदाफोर्ट सुपरफास्ट विशेष रेल्वेगाडी नियमितपणे सकाळी ५.१५ वाजता (मंगळवार, गुरुवार, शुक्रवार) जबलपूरवरून सुटून दुपारी १.५० वाजता (मंगळवार, गुरुवार, शुक्रवार) चांदाफोर्टला पोहोचेल. रेल्वेगाडी क्रमांक ०२२७३ चांदाफोर्ट-जबलपूर सुपरफास्ट विशेष रेल्वेगाडी जबलपूरवरून रात्री ११.२५ वाजता (मंगळवार, गुरुवार, शुक्रवार) सुटेल. ही गाडी दुपारी २.५० वाजता चांदाफोर्टला येईल. ही गाडी मदनमहल, नैनपूर, बालाघाट व गोंदियात थांबणार आहे.

.............

Web Title: Riva-Itwari special train launched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.