गुडघा प्रत्यारोपणात शस्त्रक्रियेत रोबोटिक तंत्रज्ञान अचूक व परिपूर्णतेच्या जवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:07 AM2021-07-21T04:07:13+5:302021-07-21T04:07:13+5:30

- ‘रोबोटिक नी रिप्लेसमेंट’ शस्त्रक्रिया नागपूर : गुडघ्याची झीज झाल्यानंतर त्यावर उपचार म्हणून गुडघ्याची वाटी बदलविण्याची शस्त्रक्रिया करावी लागते. ...

Robotic technology in knee transplant surgery is close to accuracy and perfection | गुडघा प्रत्यारोपणात शस्त्रक्रियेत रोबोटिक तंत्रज्ञान अचूक व परिपूर्णतेच्या जवळ

गुडघा प्रत्यारोपणात शस्त्रक्रियेत रोबोटिक तंत्रज्ञान अचूक व परिपूर्णतेच्या जवळ

googlenewsNext

- ‘रोबोटिक नी रिप्लेसमेंट’ शस्त्रक्रिया

नागपूर : गुडघ्याची झीज झाल्यानंतर त्यावर उपचार म्हणून गुडघ्याची वाटी बदलविण्याची शस्त्रक्रिया करावी लागते. या शस्त्रक्रियेदरम्यान अचूकता आवश्यक असते. ही अचूकता प्राप्त करणे अनेकदा पारंपरिक पद्धतीने शक्य नसले तर अशावेळी ‘रोबोटिक नी रिप्लेसमेंट’ म्हणजे ‘रोबोटिकच्या साहाय्याने गुडघा प्रत्यारोपण’ प्रभावी ठरते. हे स्पष्ट करणारे शोधपत्र प्रतिष्ठित इंडियन जर्नल ऑफ ऑर्थोपेडिक्समध्ये प्रकाशित झाले आहे. विशेष म्हणजे ‘रोबोटिक नी रिप्लेसमेंट’ ही महागडी नसून पारंपरिक गुडघा प्रत्यारोपण सर्जरी एवढाच खर्च असतो, हे विशेष.

रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण सर्जन डॉ. मुकेश लढ्ढा म्हणाले, रोबोटिक सर्जरी म्हणजे रोबोट शस्त्रक्रिया करीत नसतो. एका रोबोटिक हाताच्या साहाय्याने पायातील हाडांना योग्य रीतीने आकार देत सहकार्य करीत असतो. त्यामागे बुद्धी ही डॉक्टरांचीच असते. आज भारतात अधिक शस्त्रक्रिया पारंपरिक पद्धतीने करण्यात येत असल्या तरी अचूकतेमुळे रोबोटिक असिस्टेट गुडघ्याचे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया प्रचलित होत आहे. या शस्त्रक्रियेमुळे सांध्यांच्या नैसर्गिक गुणधर्मापर्यंत पोहचून अचूकता प्राप्त करता येऊ शकते. याशिवाय कमी काप, हाडांचे कमी नुकसान व पेशी व उतींना (टिश्यू) कमी हानी होत असल्याने या शस्त्रक्रिया रुग्णांना लाभदायक ठरत आहे.

ऑर्थोपेडिक्स सर्जन डॉ. दिलीप राठी म्हणाले, अनेकदा गुडघ्यांच्या वेदना असह्य आहेत म्हणून गुडघे बदलवून टाका, असेही रुग्ण आम्हाला स्वत:हून सांगतात. मात्र, त्यापूर्वी वेदनांची तीव्रता आणि ते दुखणे किती जुनाट आहे, यावरून मूल्यांकन करून उपाय ठरवावा लागतो. जर कुठलाच उपाय शक्य नसेल तर शेवटी गुडघा प्रत्यारोपण करावे लागते. मात्र, रोबोटिक सर्जरीमुळे आता गुडघा प्रत्यारोपण अचूक व परिपूर्ण होत असल्याने रुग्णांना त्याचा फायदा होत आहे.

गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्यावर दुसऱ्याच दिवशी रुग्ण चालू शकतो. दरम्यान त्यास फिजियोथेरपीचे व्यायाम करविल्या जातात. कालांतराने रुग्ण चालणे-फिरणे, वाहन चालविणे, जिने चढणे-उतरणे, मांडी घालून बसणे या क्रिया सहजतेने करू शकतात.

गुडघ्याच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे यश हे ‘लिम्ब अलायमेंट’ म्हणजे कमरेखालून पाय किती सरळ आहेत, कृत्रिम सांधे योग्य पद्धतीने स्थापित झालेय का आणि लिगामेंटचे अचूक संतुलन यावर अवलंबून असते. लिम्ब अलायमेंटसाठी ० ते ६ टक्के अंशाचा कोन आवश्यक असतो. जेवढा कमी अंशाचा कोन असेल तेवढी शस्त्रक्रिया अधिक यशस्वी आणि दीर्घकालीन टिकणारी असते. एरवी पारंपरिक पद्धतीने व कॉम्प्युटरच्या साहाय्याने हा कोन ० ते ३ अंशांपर्यंत असतो. मात्र, रोबोटिकच्या साहाय्याने हा कोन १.२४ अंशापर्यंत खाली आणता आला आहे. म्हणजे जवळपास नैसर्गिक रचनेच्या जवळपास आणता येते हे संशोधनात आढळून आले. सांध्यांना स्थापित करताना झिजलेला टोंगळ्याचा भाग काढून त्यात कृत्रिम सांधा अचूकतेने बसवावा लागतो. त्यासाठी योग्य अंशात कृत्रिम सांधे प्रत्येक रुग्णाच्या अनुसार बसवावे लागतात. यात रोबोटिक नी रिप्लेसमेंट सहाय्यभूत ठरते. त्या अनुषंगाने हे कृत्रिम सांधे हे ० ते १ अंशादरम्यान बसतात. हेदेखील अचूकतेच्या जवळ जाणारे आहे. या दोन्ही बाबींमुळे लिगामेंटचे अचूक संतुलन होत आहे. एकूणच या तिन्ही गोष्टींमधील अचूकतेमुळे रोबोटिक साहाय्याने केलेली कृत्रिम सांध्ये प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अचूकतेकडे जाणारी असते. पारंपरिक व कॉम्प्युटरच्या साहाय्याने केलेल्या शस्त्रक्रियेहून रोबोटिक शस्त्रक्रिया अधिक अचूक असल्याचेही संशोधनात आढळून आले आहे.

४०, बलराज मार्ग, धंतोली येथे स्थित आरएनएच हॉस्पिटल हे मध्य भारतातील अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे ३० बेडेड ‘ऑथोर्पेडिक्स सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल’ आहे. येथे रोबोटिक गुडघा प्रत्यारोपणासह टोटल हीप रिप्लेसमेंट, टोटल शोल्डर रिप्लेसमेंट, रिव्हिजन जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी, ऑर्थरोस्कोपी, लिगामेंट व स्पोर्टस इंज्युरी, शोल्डर सर्जरी, शोल्डर टेंडन रिपेअर, टेंडन इंज्युरी यासह स्पाईन सर्जरी व फ्रॅक्चर व अ‍ॅॅक्सिडेंट यावर उपचार करण्यात येतो. सुपरस्पेशालिटी ऑर्थोपेडिक्स डॉक्टरांची चमू उपचार पुरविण्यात अग्रेसर असतात. हॉस्पिटलचे संचालक व ऑथोर्पेडिक्स सर्जन अ‍ॅन्ड ट्रॉमा स्पेशलिस्ट डॉ. दिलीप राठी आणि जॉईंट रिप्लेसमेंट व ऑर्थोस्कोपी सर्जन डॉ. मुकेश लड्ढा रुग्णांना सेवा देत आहेत.

चौकट :

रोबोटिन गुडघे प्रत्यारोपणाचे फायदे

- शस्त्रक्रियेदरम्यान, हाडाची कमी हानी

- रक्ताची कमी हानी

- फिजिओथेरपी कमी आवश्यकता, जलद रिकव्हरी

गुडघा प्रत्यारोपण का करावे?

गुडघ्यामध्ये असलेल्या कार्टलेजचा थर झिजल्याने गुडघ्याचे कार्यान्वयन बिघडते. त्यामुळे चालण्यास त्रास होतो, गुडघा दुखतो व त्यावर सूज येते, पायाच्या आकारमानात असमानता येते. वयोमानानुसार गुडघ्याचे कार्टलेज झिजल्या जातात; तरीदेखील अपघातामुळे व लिगामेंट इंज्युरीमुळे कमी वयातही हे कार्टलेस झिजल्या जाऊन गुडघा दुखावू शकतो. गुडघ्यातील ही झिज पहिल्याच टप्प्यात आढळून आली, तर औषधोपचार आणि फिजियोथेरपीसारख्या उपचार प्रणालींमुळे तात्पुरता आराम पडतो. मात्र, गुडघे जास्त प्रमाणात झिजल्या गेल्यास त्यावर गुडघ्यांचे प्रत्यरोपण हा एक प्रभावी उपचार आहे.

लक्षणे :

- असह्य वेदना : पायऱ्या चढताना, वजन उचलताना गुडघा दुखणे; चालताना त्रास होणे, भारतीय शैलीच्या टॉयलेटमध्ये बसताना त्रास व वेदना होणे

- सूज : गुडघा झिजल्यामुळे सांध्यांवर सूज येते.

- गुडघे अकडणे : कडकपणा आल्याने गुडघे अकडतात. सूज आल्याने व सांध्यांची झिज झाल्याने कडकपणा येतो.

Web Title: Robotic technology in knee transplant surgery is close to accuracy and perfection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.