नागपूरच्या  कोळसा व्यापाऱ्याचे  ७० लाख रुपये लंपास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 11:53 PM2018-04-06T23:53:29+5:302018-04-06T23:53:41+5:30

गणेशपेठेतील एका कोसळा व्यापाऱ्याची ७० लाखांची रोकड घेऊन त्यांचा वाहनचालक पळून गेला. नीलेश पखाले (वय ३४) असे आरोपीचे नाव असून, तो खरबी, नंदनवनमध्ये राहतो. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली.

Rs 70 lakh stolen to Nagpur's Coal dealer |  नागपूरच्या  कोळसा व्यापाऱ्याचे  ७० लाख रुपये लंपास 

 नागपूरच्या  कोळसा व्यापाऱ्याचे  ७० लाख रुपये लंपास 

googlenewsNext
ठळक मुद्देड्रायव्हरने केला विश्वासघात 

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गणेशपेठेतील एका कोसळा व्यापाऱ्याची ७० लाखांची रोकड घेऊन त्यांचा वाहनचालक पळून गेला. नीलेश पखाले (वय ३४) असे आरोपीचे नाव असून, तो खरबी, नंदनवनमध्ये राहतो. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली.
गोदरेज आनंदम सिटीत वास्तव्यालाअसलेले नितीन मारोतराव उपरे (वय ३३) कोळसा व्यावसायिक आहेत. ते एका फ्युएल कंपनीतही भागीदार आहेत. उपरे आणि त्यांचे भागीदार एका बैठकीच्या निमित्ताने रेल्वेस्थानकाकडे निघाले. उपरेंकडे ७० लाखांची रोकड होती. बैठकीला वेळ असल्यामुळे त्यांनी एवढी मोठी रक्कम जवळ ठेवण्याऐवजी ती घरी पत्नीला देऊन ये, असे सांगून कारचालक नीलेशला आपल्या घरी पाठवले. त्यानुसार, आलिशान कार आणि रक्कम घेऊन नीलेश उपरेंच्या घरी पोहचला. त्याने पार्किंगमध्ये कार उभी केली. तेथून आपली दुचाकी घेतली आणि रोकड घेऊन पळून गेला. दीडएक तास होऊनही नीलेश परतला नाही. त्यामुळे उपरेंनी आधी पत्नीला फोन केला. तो घरी आलाच नाही, असे कळाल्याने त्यांनी नीलेशला फोन केला असता काही वेळेतच रक्कम देऊन परत येतो, असे तो म्हणाला. त्यामुळे उपरे निश्चिंत होऊन आपल्या कामी लागले. सायंकाळ झाली तरी तो परत आला नाही त्यामुळे त्यांनी पुन्हा नीलेशला फोन केला. यावेळी त्याचा फोन स्वीच्ड आॅफ होता. त्याने दगाबाजी केल्याचे लक्षात आल्याने उपरेंनी गणेशपेठ ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी लगेच त्याच्या खरबीतील घरी धडक दिली. मात्र. तो पत्नी आणि साळीसह निघून गेल्याचे कळले. त्यामुळे पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. वृत्त लिहिस्तोवर या संबंधाने गणेशपेठ ठाण्यातून सविस्तर माहिती मिळाली नव्हती.
अत्यंत विश्वासपात्र होता
सूत्रांच्या माहितीनुसार, नीलेश गेल्या पाच वर्षांपासून उपरेंकडे कामाला होता. तो अत्यंत विश्वासपात्र असल्यामुळेच उपरे त्याच्याकडून लाखोंच्या रक्कमेचे व्यवहार करीत होते. आज मात्र त्याने विश्वासघात केला. त्यामुळे त्यांना जबर धक्का बसला आहे.

Web Title: Rs 70 lakh stolen to Nagpur's Coal dealer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.