संघ कार्य हे ईश्वरी कार्य : मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 08:57 PM2018-11-09T20:57:15+5:302018-11-09T21:00:17+5:30

संघ कार्य (राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे) हे ईश्वरी कार्य असून आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांची ही तपोभूमी आहे. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस यांच्या तपस्येतून येथील वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे देशभरातील स्वयंसेवकांसाठी हे स्थळ जागृत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे केले.

RSS work is God's work: Mohan Bhagwat | संघ कार्य हे ईश्वरी कार्य : मोहन भागवत

संघ कार्य हे ईश्वरी कार्य : मोहन भागवत

googlenewsNext
ठळक मुद्देस्मृती भवनाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संघ कार्य (राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे) हे ईश्वरी कार्य असून आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांची ही तपोभूमी आहे. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस यांच्या तपस्येतून येथील वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे देशभरातील स्वयंसेवकांसाठी हे स्थळ जागृत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे केले. 


रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हेडगेवार स्मारक समिती परिसरातील स्मृती भवनाच्या नवीन इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सरकार्यवाह भय्याजी जोशी, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, महापौर नंदा जिचकार, खा. विकस महात्मे, जितेंद्रनाथ महाराज, मनमोहन वैद्य, माजी खा. अजय संचेती, प्रमिलाताई मेढे, शांताक्का, आ. परिणय फुके, आ. मिलिंद माने, आ. विकास कुंभारे, संदीप जोशी आदी उपस्थित होते.
मोहन भागवत म्हणाले, नवीन इमारतीच्या उभारणीत देशभरातील लहान मोठ्या सर्वच स्वयंसेवकांचे योगदान आहे. अशा प्रकारच्या आवश्यकतेकडे आमचे लक्ष उशिरा जाते. जेव्हा आवश्यकता पूर्ण केली जाते, तेव्हापर्यंत आवश्यकता कितीतरी अधिक वाढलेली असते. इमारत झाली, त्याची देखभालही होईलच परंतु याहीपेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे, देशभरातील स्वयंसेवकांनी डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी यांच्या जीवन कार्यापासून प्रेरणा घेऊन त्यांचे विचार व गुण आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी भवनाच्या निर्मितीसाठी महत्त्वाचे योगदान देणारे अजित देशपांडे, अनिरुद्ध देशपांडे, हेमंत मुंडले, नरेंद्र बोबडे, नीलेश काटे, गजानन मडावी, निरंजन देशकर यांचा मोहन भागवत व भय्याजी जोशी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.संघचालक श्रीधरराव यांनी संचालन केले.

४ माळे, ४० खोल्या, ४ हॉल

स्मृती भवनाची नवीन इमारत ही तळमजल्या व्यतिरिक्त चार माळ्यींची आहे. तळ मजल्यात प्रदर्शन भरवण्यासाठी जागा आहे. खाली कार्यालय, भोजन कक्ष, स्वागत कक्ष आहे. पहिल्या माळ्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक, सरकार्यवाह यांची खोली, स्वागत कक्ष, तसेच त्यांचे स्वीय सहायकांच्या खोल्या आहेत. दुसरा माळा ते चौथ्या माळ्यावर इतर पदाधिकाऱ्यांच्या खोल्या, भोजन कक्ष व सभागृह आहेत.

Web Title: RSS work is God's work: Mohan Bhagwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.