लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राजकारणाच्या आडून गुन्हेगारीत सक्रिय असलेला कुख्यात गुन्हेगार साहिल ऊर्फ समीर खुर्शीद सय्यद याने पोलिस चौकशीत अनेक खळबळजनक खुलासे केल्याची चर्चा आहे. ही माहिती बाहेर जाऊ नये, यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी चुप्पी साधणे पसंत केले आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.साहिल हा विविध राजकीय नेत्यांसोबत वावरून राजकारणाच्या आडून गुन्हेगारी करीत होता. तो रेतीच्या तस्करीपासून तर अवैध जमिनीच्या कब्जा प्रकरणापर्यंत सक्रिय होता. त्याच्यासोबत अनेकांचे लागेबांधे होते. रविवारी पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याने तेव्हापासून पोलिसांच्या चौकशीत अनेक खळबळजनक खुलासे केल्याची सूत्रांची माहिती आहे. साहिलच्या प्रकरणाने राज्यातील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडवली आहे. साहिलने केलेले खुलासे चर्चेला आल्यास अनेकांची अडचण होऊ शकते. पोलिसांचीही गोची होऊ शकते, हे ध्यानात आल्यामुळे पोलीस अधिकारी साहिलच्या प्रकरणावर बोलण्याचे टाळत आहेत. आज वारंवार फोन करूनही गुन्हेशाखेच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी रात्रीपर्यंत प्रतिसाद देण्याचे सौजन्य दाखवले नाही. अनेकांचे फोन नुसतेच वाजत राहिले.दरम्यान, साहिलच्या खळबळजनक खुलाशांची माहिती कर्णोपकर्णी पसरल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.आणखी चार तक्रारीसाहिलच्या विरोधात एका तहसीलदारासह पुन्हा चौघांनी तक्रार अर्ज दिले आहेत. या माहितीला प्रभारी सहपोलीस आयुक्त डॉ. नीलेश भरणे यांनी दुजोरा दिला आहे. चौकशीत काय पुढे आले, याची माहिती आपल्यापर्यंत अद्याप पोहोचली नाही, असे डॉ. भरणे यांनी लोकमतला सांगितले.
साहिल प्रकरण ठरले हायप्रोफाईल : अनेक खळबळजनक खुलासे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 11:04 PM
राजकारणाच्या आडून गुन्हेगारीत सक्रिय असलेला कुख्यात गुन्हेगार साहिल ऊर्फ समीर खुर्शीद सय्यद याने पोलिस चौकशीत अनेक खळबळजनक खुलासे केल्याची चर्चा आहे. ही माहिती बाहेर जाऊ नये, यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी चुप्पी साधणे पसंत केले आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
ठळक मुद्देपोलिसांनी साधली चुप्पी