बनावट कागदपत्रांद्वारे शेतीची विक्री

By Admin | Published: July 31, 2016 02:45 AM2016-07-31T02:45:06+5:302016-07-31T02:45:06+5:30

पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जाखेगाव (ता. कामठी) येथील एका शेतकऱ्याची जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर विक्री केल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे.

Sale of agriculture through fake documents | बनावट कागदपत्रांद्वारे शेतीची विक्री

बनावट कागदपत्रांद्वारे शेतीची विक्री

googlenewsNext

सरपंचासह तिघांना अटक : अधिकाऱ्यांच्या नावांचे शिक्के जप्त
मौदा : पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जाखेगाव (ता. कामठी) येथील एका शेतकऱ्याची जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर विक्री केल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. या कारवाईत मौदा पोलिसांनी केम-पळसाडचे सरपंच विनोद शेंडे यांच्यासह अन्य तीन आरोपींना अटक केली आहे.
विनोद विश्वनाथ शेंडे (३३, रा. केम), अजय मनोहर घोडमारे (३१, रा. पांढरकवडा), राजेश खुशाल चरडे (३४, रा. चिकना) व मोरेश्वर भाकरू चापरे (३२, रा. पानमारा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. फिर्यादी मनोहर गणपतराव आष्टनकर (रा. गुमगाव, ता. हिंगणा) यांच्या मालकीची शेतजमीन जाखेगाव प.ह.नं. २६(अ), सर्व्हे नं.७४/१, आराजी ०.४२ हेक्टर आर, ०.००२ हे.आर, ००.४४ हे. आर. व सर्व्हे नं. ३७/२ ब आराजी ००.८१ हे.आर. अशी एकूण ०१.२५ हेक्टर आर मिळकत आहे. शेतमालक स्वत: जमीन न कसता ठेकेपद्धतीने कसण्यास देतात. त्यामुळे सदर शेतीवर त्यांची दररोजची वहीवाट नसते. या गोष्टीचा गैरफायदा या प्रकरणाचा ‘मास्टरमार्इंड’ आरोपी सरपंच विनोद शेंडेने घेतला.
सदर शेतीचा सौदा अजय मनोहर घोडमारे (रा. पांढरकवडा, पोलीस स्टेशन, कुही) यांच्याशी केला. दरम्यान आरोपीने उपविभागीय अधिकारी, दुय्यम निबंधक, तहसीलदार अशा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या नावांचे खोटे रबरी शिक्के बनवून शेतीची बनावट कागदपत्रे तयार केली. आरोपी राजेश खुशाल चरडे व मोरेश्वर भाकरू चापरे यांच्या साक्षीनिशी रजिस्ट्री करुन दिली.
रजिस्ट्रीची कागदपत्रे घेऊन आरोपी अजय मनोहर घोडमारे याने सदर शेती आपल्या नावे करण्यासाठी फेरफार प्रकरण जाखेगावचे तलाठी काळबांडे यांच्याकडे सादर केले. तलाठी काळबांडे यांनी या खरेदी-विक्री व्यवहाराबाबत गुमगावचे (ता. हिंगणा) तलाठी अनिल ब्रम्हे यांच्याशी चर्चा केली. यावरून तलाठी ब्रम्हे यांनी भ्रमणध्वनीवरूनशेतमालक मनोहर आष्टनकर यांच्याशी संपर्क साधला असता, अशा प्रकारचा कोणताही व्यवहार झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर शेतमालक मनोहर आष्टनकर यांनी सदर फेरफार थांबविण्याची विनंती महसूल विभागाकडे केली व बनावट रजिस्ट्रीची तक्रार शेतखरेदीदार अजय घोडमारे यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन मौदा येथे केली.प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत मौद्याचे ठाणेदार भीमराव टेळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक किशोर धोपाडे यांनी तपास सुरू केला होता. प्रकरणाचा मास्टरमार्इंड असलेला सरपंच विनोद शेंडे याचा शोध घेतला. शेत खरेदीदार अजय मनोहर घोडमारे, साक्षीदार राजेश चरडे, मोरेश्वर चापरे यांच्यासह सरपंच विनोद शेंडे यांच्याविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१,४७३, ३४ अन्वये गुन्हा नोंदवून चारही आरोपींना अटक केली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Sale of agriculture through fake documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.