नागपूर रेल्वेस्थानकावरील कुलींच्या समर्पणभावाला सलाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 12:01 PM2018-06-11T12:01:51+5:302018-06-11T12:01:57+5:30

अनेकदा अडचणीत सापडलेल्या प्रवाशांचे सामान मोफत त्यांच्या बर्थपर्यंत पोहोचवून कुलींनी आपला समर्पणभाव दाखवून दिला आहे.

Salute to the dedication of the coolies on the Nagpur railway station | नागपूर रेल्वेस्थानकावरील कुलींच्या समर्पणभावाला सलाम

नागपूर रेल्वेस्थानकावरील कुलींच्या समर्पणभावाला सलाम

googlenewsNext
ठळक मुद्देअडचणीतील प्रवाशांना देतात विनाशुल्क सेवा

दयानंद पाईकराव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वार्थाने भरलेल्या युगात प्रत्येकजण आपला स्वार्थ साधण्यासाठी धडपडतो. पैसा कमविण्यासाठी तर माणूस माणुसकी सोडून कोणत्याही मार्गाचा अवलंब करत आहे. परंतु या स्वार्थापासून रेल्वेस्थानकावरील कुली कोसो दूर आहेत. आजपर्यंतच्या घटनात वेळोवेळी त्यांनी हे सिद्धही केले. अनेकदा अडचणीत सापडलेल्या प्रवाशांचे सामान मोफत त्यांच्या बर्थपर्यंत पोहोचवून कुलींनी आपला समर्पणभाव दाखवून दिला आहे.
अडचणीतील प्रवाशांना मदत करण्यासाठी रेल्वेस्थानकावरील कुली तत्पर असतात. मागील महिनाभरात घडलेल्या दोन घटनांनी कुलींचा सेवाभाव समोर आला. ७ जूनला पुणे-हावडा आझादहिंद एक्स्प्रेसच्या ए-१ कोचच्या एसीमध्ये बिघाड झाला. एसी दुरुस्तीच्या मागणीसाठी प्रवाशांनी बडनेरा, वर्धा स्थानकावर गोंधळ घातला. प्रवासी गोंधळ घालत असल्याची माहिती नागपूरच्या नियंत्रण कक्षाला समजताच येथील अधिकाऱ्यांनी ए-१ कोच तयार ठेवला. ही गाडी नागपूर रेल्वेस्थानकावर येताच प्रशासनाने नादुरुस्त झालेला ए-१ कोच तातडीने बदलून नवा कोच गाडीला जोडला. गाडीला विलंब होऊ नये म्हणून अधिकाºयांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सेंट्रल रेल्वे भारवाहक संघाचे अध्यक्ष अब्दुल मजीद यांच्या नेतृत्वाखाली सुशील अवतार, सोनु गायकवाड, लखन लाल सैनी, नौशाद खान, नफीस अहमद, छोटे खान, अमर सिंह जोगी, नितीन बारामती आदी कुलींनी नि:शुल्क सेवा देत एक रुपयाही न घेता सर्व प्रवाशांचे सामान नव्या कोचमध्ये पोहोचविले. कुलींच्या सेवेबद्दल प्रवाशांनीही त्यांना मनापासून धन्यवाद दिले. ही एकच घटना नव्हे तर १५ दिवसांपूूर्वी गोरखपूर-यशवंतपूर गाडीचे चाक तुटल्यानंतर ही गाडी सोनखांब-कोहळी स्थानकादरम्यान तब्बल ५ तास जागेवरच उभी होती. या गाडीचे चाक तुटलेल्या कोचमधील प्रवाशांचे सामानही कुलींनी विनाशुल्क हलविण्यास मदत केली होती. याशिवाय रेल्वेस्थानकावर असंख्य वेळा अडचणीत सापडलेल्या प्रवाशांना मदत करण्याचे काम रेल्वेस्थानकावरील कुली करत राहतात. पैशासाठी एकमेकांचा गळा कापण्याच्या युगात कुलींचा हा सेवाभाव समाजाला नक्कीच प्रेरणा देणारा आहे.

११ लाखाचे दागिने केले होते परत
दोन वर्षापूर्वी रेल्वेस्थानकाच्या संत्रा मार्केटकडील कडील भागात एक महिला आपली बॅग पोलीस बुथजवळ विसरली.बराच वेळ होऊन सुटकेसजवळ कोणीच येत नसल्याचे पाहून कुली अब्दुल मजीद यांनी ती सुटकेस आपल्या ताब्यात घेतली. बॅगमध्ये वाजत असलेला मोबाईल उचलून संबंधीत महिलेला बॅग आपल्याजवळ असल्याचे सांगितले. ती महिला आल्यानंतर त्या बॅगमध्ये ११ लाखाचे दागिने असल्याचे समजले.

Web Title: Salute to the dedication of the coolies on the Nagpur railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.