ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 3 - समाजकारणातून राजकारणाच्या मैदानात उडी घेतलेल्या ह्यसंभाजी ब्रिगेडह्णने संघभूमीत प्रस्थापितांना टक्कर देण्याचा संकल्प केला आहे. आगामी महानगरपालिका निवडणूकांत ह्यसंभाजी ब्रिगेडह्णचे उमेदवार निवडणूकांच्या रणधुमाळीत उतरणार आहे. मराठा मूक मोर्चांमुळे राज्यातील राजकारण तापले होते. त्या पार्श्वभूमीवर निवडणूकांत ह्यसंभाजी ब्रिगेडह्णच्या ह्यएन्ट्रीह्णमुळे इतर राजकीय पक्षांना थोडाफार फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.जेम्स लेन प्रकरणापासून विविध विषयांवर आक्रमक भूमिका घेणाऱ्या ह्यसंभाजी ब्रिगेडह्णने निवडणूक आयोगाकडे राजकीय पक्ष म्हणून नोंदणी केली आहे. ३० नोव्हेंबर रोजी मुंबईत राजकीय पक्षाची घोषणा झाली. त्यानंतर आगामी मनपा तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूका लढण्याचा संकल्प पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता. मंगळवारी नागपुरात ह्यसंभाजी ब्रिगेडह्णची बैठक झाली. यात पुढील मनपा निवडणूकांसंदर्भातील रणनिती तसेच शहरात पक्षमजबूतीसंदर्भात चर्चा झाली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष व निरीक्षक डॉ.गजानन पारधी, केंद्रीय निरीक्षक चंद्रकांत वैद्य उपस्थित होते. नागपूर जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत निवडणूका लढविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या निवडणूकांत प्रचार कसा राहील, उमेदवारांची निवड कशी होईल, कार्यकर्ते कसे वाढतील, इत्यादीबाबत बैठकीत चर्चा झाली.
मनपा निवडणूकांत उतरणार संभाजी ब्रिगेड
By admin | Published: January 03, 2017 10:33 PM