लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सध्या प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळा परिसरातील कलाग्राम येथे नागपुरातील संस्कार भारतीच्या कलावंतांनी सुंदर रांगोळ्या रेखाटल्या असून, भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या रांगोळ्यांनी कुंभमेळ्यात आलेल्या भाविकांचे लक्ष वेधून घेतले आहे. नागपूरच्या या कलावंतांनी काढलेल्या या रांगोळ्यांची कुंभमेळ्यात प्रचंड प्रशंसा होत आहे.देशातील सर्वात मोठा उत्सव असलेल्या प्रयोगराज येथील कुंभमेळा परिसरात दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रातर्फे कलाग्राम वसविण्यात आले आहे. यात संस्कार भारतीचे कलावंत सहभागी झाले आहेत. यामध्ये विदर्भातील ११ रांगोळी कलावंतांचा सहभाग आहे. हे सर्व कलावंत संस्कार भारतीच्या नागपूरच्या अध्यक्षा कांचनताई गडकरी यांच्या नेतृत्वात गेले आहेत.हे कलावंत २९ जानेवारीपासून १ फेब्रुवारीपर्यंत या परिसरात विविध रांगोळ्या काढून परिसराची शोभा वाढवीत आहेत. आतापर्यंत त्यांनी भरपूर रांगोळ्या काढल्या आहेत. या रांगोळीतून धार्मिक प्रतीक आणि शुभचिन्हे दर्शवीत एकूणच भारतीय संस्कृती रेखाटण्यात येत आहे. भारतीय संस्कृतीवर आधारित संस्कार भारतीच्या रांगोळ्या भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत.या रांगोळी कलावंतांमध्ये रोहिणी घरोटे, हर्षल कावरे, चंद्रकांत घरोटे, राजश्री कुलकर्णी, स्वाती बनसोड, चंदा मुरकुटे, अनघा चेपे, अनघा मोहरील, दीपक जोशी, चंद्रकांत सहारे या कलावंतांचा समावेश आहे.स्वरकुंभ व युगांधर कृष्णकुंभमेळा परिसरात दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे कलावंतही सहभागी झाले आहेत. या कलावंतांनी स्वरकुंभ आणि युगांधर कृष्ण हे नाटक तिथे सादर केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन कांचन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरचे निदेशक डॉ. दीपक खिरवाडकर, उत्तर मध्य सांस्कृतिक केंद्र प्रयागराज (उत्तर प्रदेश)चे निदेशक इंद्रजित ग्रोवर, कार्यक्रम अधिकारी प्रेम तिवारी व कार्यक्रम अधिकारी दीपक कुलकर्णी उपस्थित होते.
संस्कार भारतीच्या रांगोळ्यांची कुंभमेळ्यात प्रशंसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 12:33 AM
सध्या प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळा परिसरातील कलाग्राम येथे नागपुरातील संस्कार भारतीच्या कलावंतांनी सुंदर रांगोळ्या रेखाटल्या असून, भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या रांगोळ्यांनी कुंभमेळ्यात आलेल्या भाविकांचे लक्ष वेधून घेतले आहे. नागपूरच्या या कलावंतांनी काढलेल्या या रांगोळ्यांची कुंभमेळ्यात प्रचंड प्रशंसा होत आहे.
ठळक मुद्देनागपूरच्या कलावंतांनी वेधले भाविकांचे लक्ष