संतोष आंबेकरने डेव्हलपरकडून वसूल केले सावकारी व्याज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 10:56 AM2019-11-02T10:56:43+5:302019-11-02T10:57:11+5:30

कुख्यात आरोपी संतोष आंबेकरने चार वर्षांपूर्वी एका तरुण डेव्हलपरला जबरदस्ती आदिवासीची जमीन खरेदी करून प्लॉट टाकण्यासाठी दबाव टाकला होता. त्यासोबतच साडेसात लाख रुपयांची सावकारी व्याजाची वसुली केल्याचा गुन्हा लकडगंज पोलिसांनी दाखल केला आहे.

Santosh Ambkar recovers loan interest from developer | संतोष आंबेकरने डेव्हलपरकडून वसूल केले सावकारी व्याज

संतोष आंबेकरने डेव्हलपरकडून वसूल केले सावकारी व्याज

Next
ठळक मुद्देआंबेकर, अरमरकर आणि दलाल अरविंद पटेलची न्यायालयीन कोठडीत रवानगी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुख्यात आरोपी संतोष आंबेकरने चार वर्षांपूर्वी एका तरुण डेव्हलपरला जबरदस्ती आदिवासीची जमीन खरेदी करून प्लॉट टाकण्यासाठी दबाव टाकला होता. त्यासोबतच त्याला जमिनीच्या खरेदीसाठी ३२ लाख रुपये देऊन साडेसात लाख रुपयांची सावकारी व्याजाची वसुली केल्याचा गुन्हा लकडगंज पोलिसांनी दाखल केला आहे.
प्रशांत रमेश कांबळी (३२) रा. व्यंकटेशनगर असे फिर्यादीचे नाव आहे. मुख्य आरोपी संतोष आंबेकर आणि त्याचा भाचा नीलेश केदारसह इतरांचा यात समावेश आहे. हे प्रकरण २०१५ मधील आहे. संतोषने फिर्यादी प्रशांत कांबळीला उमरेडच्या मौजा उटी येथे खाते क्रमांक १३१ येथील २.८६ हेक्टर आर आदिवासी परिवाराची जमीन खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित केले होते. ही जमीन आदिवासीची असल्यामुळे अहस्तांतरणीय आहे, हे माहीत असतानाही संतोषने स्वत:ची मंत्रालयात ओळख असून जमीन सोडविण्याचा दावा केला होता. त्याने ले-आऊटमध्ये आपला भाचा नीलेश केदारला ५० टक्के भागीदार बनविले होते.
दुसरीकडे जमिनीचा सौदा केल्यानंतर आपली मुलगी संचिताच्या नावावर ले-आऊट टाकायला लावले. अशा प्रकारे या व्यावसायिकाला फसवून तसेच मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत वसुली केली होती. फिर्यादीच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी जीवे मारण्याची धमकी देणे तसेच महाराष्ट्र सावकारी कायदा २०१४ च्या कलम ४४, ४५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय १२ आॅक्टोबरला सीताबर्डी ठाण्यात आरोपी संतोष आंबेकर, नीलेश केदार, चंदन चौधरी, जुही चौधरी, अंकितकुमार पटेल, अजय पटेल, राजा अरमरकरला महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ अंतर्गत अटक केली आहे. यात नीलेश केदार, चंदन चौधरी, जुही चौधरी, अंकित पटेल आणि अजय पटेलला शुक्रवारी १ नोव्हेंबरला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या पाच आरोपींना ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
१४ दिवसाची न्यायालयीन कोठडी
फसवणुकीच्या प्रकरणात मुख्य आरोपी संतोष आंबेकर, राजा अरमरकर, अरविंद द्वारकाभाई पटेल या तिघांच्या पोलीस कोठडीचा अधिकार अबाधित ठेऊन फरार आरोपींच्या अटकेनंतर पुन्हा पोलिसांना पोलीस कोठडी घ्यावयाची आहे. या उद्देशाने शुक्रवारी संतोष, राजा आणि अरविंद पटेलची न्यायालयीन कोठडी मागण्यात आली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने तिन्ही आरोपींची १४ दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. त्यानंतर आरोपी संतोष आंबेकरला लकडगंजमध्ये दाखल छेडखानी, बलात्कार आणि बाल लैंगिक गुन्हा संरक्षण कायद्यानुसार अटक करण्याची परवानगी मागण्यात आली आहे. त्यानुसार आंबेकरची या प्रकरणातही पोलीस कोठडी घेण्यात येणार आहे.

Web Title: Santosh Ambkar recovers loan interest from developer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.