लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पिवळी नदीच्या वांजरा क्षेत्रातील नागरिकांसाठी बांधण्यात आलेला अंडरब्रिज मंगळवारी पाण्याने तुडुंब भरला. या पुलाखाली स्कूल बस फसून बंद पडली. पाणी बसमध्ये शिरायला लागले. हे बघून मुले जीवाच्या आकांताने ओरडायला लागली. अखेर नागरिकांनी धाव घेऊन बंद पडलेली बस ट्रॅक्टरच्या सहाय्याने बाहेर काढली. ही घटना मंगळवारी दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान घडली.वांजराच्या रेल्वे अंडरब्रिजमध्ये पाणी भरल्याने आजरी-माजरी, भिलगाव व वांजरा परिसरात जाणारे अनेक मार्ग बंद पडले आहेत. आजरी-माजरीकडून येणाऱ्या नागरिकांसाठी हाच एकमेव मार्ग आहे. मात्र अंडरब्रिज एवढा तुडुंब भरला की जणू तलावच वाटावा. यामुळे पायदळ चालणाऱ्या नागरिकांनी आणि दुचाकी वाहनधारकांनी रेल्वे गेट ओलांडून रस्ता पार केला. अशी परिस्थिती उद्भवली की नागरिक नाईलाजाने हा धोका पत्करतात. स्कूल बस अंडरब्रिज पार करू शकत नसल्याने विद्यार्थीही रेल्वे गेट ओलांडून पुढे जातात. यामुळे धोका वाढतो. परंतु अंडरब्रिजखाली पाणी असल्याने दुसरा पर्याय नसतो. अंडरब्रिजच्या पलीकडे वांजरा, आजरी-माजरी, बाबा दिवाण ले-आऊट, एकतानगर, शिवनगर, भिलगाव, सबीना ले-आऊट, करीमनगर, डायमंडनगर, संतोषीनगर, कळमना बायपास रोड, बिलालनगरसह सुमारे २२ रहिवासी क्षेत्र आहेत. या सर्व नागरिकांची पावसाच्या दिवसात तारांबळ उडते.टँकर अडला, भर पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंतीपावसामुळे अंडरब्रिज पाण्याने भरला असला तरी वांजरा, आजरी-माजरी क्षेत्रातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागते. नॉन नेटवर्क क्षेत्र असल्याने वाजरा परिसरात पाईपलाईनच नाहीत. त्यामुळे या परिसरात टँकरने पाणीपुरवठा होतो. हा पुरवठा दुपारी होतो. मात्र वांजरा रेल्वे अंडरब्रिज पाण्याने भरल्याने टँकर पलीकडे पोहचू शकला नाही. अखेर प्रयत्नांची शिकस्त करून नागरिकांनी हा टँकरही पाण्यातून काढला.नागरिकांनी आधीच वेधले होते लक्षवांजरा रेल्वे अंडरब्रिजच्या बांधकामातील तांत्रिक दोषांबद्दल स्थानिक नागरिकांनी सुरुवातीपासून लक्ष वेधणे सुरू केले होते. मात्र कुणीच दखल घेतली नाही. नागरिकांनी सांगितल्यानुसार, हा रेल्वे अंडरब्रिज बांधताना व्यवस्थित उतार काढण्यात आला नाही. त्यामुळे थोड्या पावसातही पाणी साचते व मार्ग बंद पडतो. सुमारे दोन वर्षांपूर्वी हा पूल बांधण्यात आला आहे. यापूर्वी नागरिक रेल्वे रुळ ओलांडून जायचे. मात्र अपघाताच्या अनेक घटना घडल्याने आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर रहदारी असल्याने प्रशासनाने अंडरब्रिज बांधला. मात्र दोन वर्षातच मार्गावर खड्डे पडले. उतार व्यवस्थित काढण्यात आला नसल्याने पाणी लवकर साचते. वरच्या भागातील भींतीला लिकेज असल्याने पाणी गळत राहते.
पाण्याने तुडुंब भरलेल्या अंडरब्रिजमध्येस्कूल बस फसली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 11:59 PM
पिवळी नदीच्या वांजरा क्षेत्रातील नागरिकांसाठी बांधण्यात आलेला अंडरब्रिज मंगळवारी पाण्याने तुडुंब भरला. या पुलाखाली स्कूल बस फसून बंद पडली. पाणी बसमध्ये शिरायला लागले. हे बघून मुले जीवाच्या आकांताने ओरडायला लागली.
ठळक मुद्देवांजरा क्षेत्रातील २२ वसाहतींचा मार्ग बंदनागरिकांसह विद्यार्थ्यांच्या जीवावर बेततेय संकट