डिसीपी रोशन यांना स्कॉच ऑर्डर ऑफ मेरिट अवॉर्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:56 AM2019-02-28T00:56:34+5:302019-02-28T01:02:35+5:30
शहर पोलीस विभागातील परिमंडळ-४ चे उपायुक्त राजतिलक रोशन यांना पोलीस सेवेत उत्कृष्ट कार्य केल्याबाबत स्कॉच ग्रुपतर्फे ‘स्कॉच ऑर्डर ऑफ मेरिट अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. २५ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथील कॉन्स्टीट्युशन क्लब येथे आयोजित समारंभात त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहर पोलीस विभागातील परिमंडळ-४ चे उपायुक्त राजतिलक रोशन यांना पोलीस सेवेत उत्कृष्ट कार्य केल्याबाबत स्कॉच ग्रुपतर्फे ‘स्कॉच ऑर्डर ऑफ मेरिट अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. २५ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथील कॉन्स्टीट्युशन क्लब येथे आयोजित समारंभात त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
बेपत्ता मुलांना शोधण्यसाठी डीसपी रोशन यांनी एक टेक्निक शोधून काढली आहे. त्याचा चांगला परिणाम दिसून आला. यासंदर्भात स्वत: डीसपी रोशन यांनी ला्रेमतशी बोलतांना सांगितले की, बेपत्ता मुलांना शोधण्यासाठी वापरण्यात येणारी ही टेक्निक त्यांनी वसई येथे कार्यरत असतांना तयार केली होती. ते वसई येथे एप्रिल २०१७ ते जुलै २०१८ पर्यंत कार्यरत होते. तिथे ही टेक्निक यशस्वीपणे लागू करण्यात आली. पालघर येथे लहान मुलं बेपत्ता होण्याची अनेक प्रकार उघडकीस येत असतात. अनेकदा पोलीस या प्मुलांचा शोध लावू शकत नाही. परंतु या टेक्निकच्या माध्यमातून अनेक बेपत्ता मुलांचा शोध लावण्यात यश आले आहे. आजही या माध्यमातून अनेक मुलांचा शोध लावला जात आहे. वसईपूर्वी ते उस्मानाबाद येथे जानेवारी २०१६ ते एप्रिल २०१७ पर्यंत कार्यरत होते. महिलांच्या तस्करीशी संबंधित प्रकरणाची चौकशी करतांना पोलिसांना अनेकदा त्रास सहन करावा लागतो. या प्रकरणाचा डिटेक्शन रेट खूप कमी होता. प्रकरणाचा शोध लावण्याची कसून चौकशीची गरज असते. यासाठी त्यांनी ७२ सूत्री मापदंड तयार केले होते. या अंतर्गत चौकशी करून त्यांनी अनेक प्रकरणाचा पर्दाफाश केला होता. आजही याच पद्धतीचा वापर करून प्रकरण उघडकीस आणले जात आहे. अवॉर्डसाठी निवड समितीने पोलीस मॅरिटाईम ट्रेनिंग व गुड टच व बॅड टच बाबतही रोशन यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले. विशेष म्हणजे डीसीपी राजतिलक रोशन यांनी आयआयटी खडकपूर येथून बीटेक व एमटेक केले आहे.
खुनाचा लावला होता शोध
उस्मानाबाद येथे एक हत्या झाली होती. मृताची ओळख पटली नव्हती. हत्या करणाऱ्या आरोपींचाही पत्ता नव्हता. अनेक प्रयत्न करूनही खुनाचा पत्ता लागला नसल्याने ती फाईल बंद करण्याची तयारी केली जात होती. त्याचवेळी रोशन यांची उस्मानाबाद येथे बदली झाली. त्यांनी या प्रकरणातील एकेक कडी जोडत हे प्रकरण उघडकीस आणले होते. आरोपींनाही अटक केली होती. या प्रकरणावर एका टीव्ही चॅनलने कार्यक्रमही तयार केला होता. या कार्यक्रमाला सोशल मीडियावर एक कोटीपेक्षाही अधिक लोकांनी पसंत कले आहे.