विदर्भातील १३ उमेदवारांची घोषणा : उर्वरित उमेदवारांची घोषणा आजनागपूर : बहुजन समाज पक्षाने गुरुवारी विदर्भातील विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करीत १३ उमेदवारांची घोषणा केली. बसपाचे राष्ट्रीय महासचिव खा. वीरसिंह आणि डॉ. सुरेश माने यांनी पत्रपरिषदेत ही यादी जाहीर केली. बसपातर्फे यापूर्वी विदर्भातील १३ उमेदवारांची घोषणा यापूर्वीच करण्यात आली. दुसऱ्या यादीमध्ये सुद्धा १३ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. दुसऱ्या यादीमध्ये रामटेक विधानसभा क्षेत्रातून भगवान भोंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. इतर उमेदवारांमध्ये राहुल अबागड यांना खामगांव (बुलडाणा), जळगाव जळगाव-जमोद(बुलडाणा)मधून त्र्यंबक निकाळजे, आकोट (अकोला)- नंदकिशोर दाबेराव, बाळापूर (अकोला ) -अरुण बगारे, वाशिम- राहुल भगत, कारंजा लाड (वाशिम)- उस्मान गर्वे, अमरावती- मिर्झा बेग, मेळघाट (अमरावती)- किसन जामकर, देवळी (वर्धा)- उमेश म्हैसकर, राजुरा (चंद्रपूर) भारत आत्राम, वरोरा (चंद्रपूर) अॅड. भूपेंद्र रायपुरे आणि यवतमाळ- मोहम्मद शम्मी यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. विदर्भातील ६२ विधानसभा मतदारसंघापैकी २६ उमेदवारांच्या नावाची घोषणा झाली आहे. उर्वरित उमेदवारांची नावेसुद्धा निश्चित झाली असून शुक्रवारी त्यांच्या नावांची घोषणा करण्यात येणार असल्याचे डॉ. माने यांनी स्पष्ट केले. तसेच मराठवाड्यातील ४६ पैकी ४० उमेदवारांची घोषणा झाली असून ६ उमेदवारांची घोषणा उद्या करण्यात येईल. तर पश्चिम महाराष्ट्रातील ६० टक्के उमेदवारांची घोषणा झाली असून इतर उमेदवारही लवकरच जाहीर केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बसपा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
By admin | Published: September 26, 2014 1:19 AM