चार वर्षात विदर्भाच्या बाजारपेठेत दिसणार सीडलेस संत्रा-मोसंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 10:26 AM2020-10-06T10:26:28+5:302020-10-06T10:30:14+5:30

Oranges, Vidarbha, Oranges नागपुरातील केद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेने संत्र्याच्या दोन आणि मोसंबीच्या चार अशा सहा नव्या प्रजाती विकसित केल्या आहेत. विशेष म्हणजे त्या सीडलेस आहेत.

Seedless oranges will appear in the Vidarbha market in four years | चार वर्षात विदर्भाच्या बाजारपेठेत दिसणार सीडलेस संत्रा-मोसंबी

चार वर्षात विदर्भाच्या बाजारपेठेत दिसणार सीडलेस संत्रा-मोसंबी

googlenewsNext
ठळक मुद्देकेद्रीय लिंबूवर्गीय फळसंशोधन संस्थेचा दावा संत्र्याच्या दोन आणि मोसंबीच्या चार नव्या प्रजाती विकसित

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरातील केद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेने संत्र्याच्या दोन आणि मोसंबीच्या चार अशा सहा नव्या प्रजाती विकसित केल्या आहेत. विशेष म्हणजे त्या सीडलेस आहेत. येत्या चार ते पाच वर्षात विदर्भातील बाजारपेठेत ही फळे दिसणार असून ही अधिक उत्पन्नाची हमी असलेली ही नवी क्रांती ठरेल, असा विश्वास संस्थेचे संचालक डॉ. एम.एस. लदानिया यांनी व्यक्त केला आहे.

मागील पाच ते सहा वर्षापासून संस्थेच्या फार्मवर या प्रजातींचे रोपण करून त्यांचे संशोधन सुरू होते. यंदा चार ते पाच वर्षानंतर या सहाही प्रजातींना फळे आली आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. लदानिया यांनी हा दावा केला. पुढील वर्षापासून या सहाही प्रजातींच्या कलमा शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या सर्व अर्ली व्हेरायटी असून कमी जागेत आणि कमी पाण्यात अधिक उत्पन्न देणाऱ्या आहेत. त्यामुळे या नवीन प्रजाती शेतकऱ्यांसाठी यशदायी आणि अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या ठरतील, असे ते म्हणाले.

ब्लड रेड माल्टा आणि जाफा या दोन प्रजातीसह ब्राझीलवरून आणलेल्या व येथील वातावरणात विकसित केलेल्या वेस्टीन आणि हमलिन या चार प्रजाती मोसंबीच्या प्रकारातील आहेत. तर, पर्ल टँजेलो आणि डेझी या संत्र्यांच्या दोन जाती आहेत. या दोन्ही प्रजाती युएसए येथील असून त्या विदर्भातील वातावरणात विकसित केल्या आहेत.
जाफा ही मोसंबी इस्त्रायल प्रजातीची असून विदर्भातील वातावरणात प्रति हेक्टरी २० टन उत्पादन घेता येऊ शकते, असा संशोधन संस्थेचा दावा आहे. तर, इटली व स्पेन येथील असलेली ब्लड रेड माल्टाचे उत्पादन प्रति हेक्टरी २५ ते ३० टन घेता येइल, असा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे. या दोन्ही प्रजाती रसदार असून ज्यूस निर्मितीसाठी उत्तम ठरणाºऱ्या आहेत. वेस्टीन आणि हमलिन या ब्राझीलवरून आणलेल्या प्रजाती रसाळ, मोठ्या आकाराच्या आणि चवीला संत्र्यासारख्या आहेत. निर्यातयोग्य असणाऱ्या आणि अधिक उत्पन्नाची हमी असणाऱ्या या प्रजाती असल्याचे डॉ. लदानिया यांनी सांगितले.

पर्ल टँजेलो ठरू शकतो नागपुरी संत्र्याला पर्याय
पर्ल टँजेलो ही संत्रा व्हेरायटी असली तरी त्या मोसंबीसारखी दिसते. विशेष म्हणजे, कमी आम्लतेचे व चवीला गोड असणारे हे फळ आहे. नागपुरी संत्र्याला पर्याय ठरू शकणारी ही व्हेरायटी असून पाचव्या वर्षी उत्पन्न मिळते. प्रति हेक्टर १२ ते १३ टन उत्पन्नाचा दावा संशोधन संस्थेने केला आहे. डेझी ही सद्धा मोसंबीसारखी दिसणारी प्रजाती असून दोन संत्रा प्रजातीमध्ये क्रॉस करून विकसित केली आहे. तिचे सुद्धा हेक्टरी उत्पादन तेवढेच सांगितले जात आहे.

मागील पाच वर्षातील संशोधनातून या प्रजाती विकसित केल्या आहेत. विदर्भाच्या वातावरणात सहजपणे रुजणाºया असून अधिक उत्पन्नाची हमी देणाऱ्या आहेत. पुढील वर्षापासून त्याच्या कलमा उपलब्ध केल्या जातील. लिंबूवर्गीय उत्पदकांसाठी ही नवी क्रांती ठरेल.
_ डॉ. एम.एस. लदानिया, संचालक, केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था

 

Web Title: Seedless oranges will appear in the Vidarbha market in four years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fruitsफळे