हॉलमार्किंगचे दागिने विका; अन्यथा दंड व कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2022 07:45 AM2022-05-17T07:45:00+5:302022-05-17T07:45:01+5:30

Nagpur News नागपूर विभागात १३ जिल्ह्यांमध्ये सराफांना हॉलमार्किंग दागिन्यांची विक्री बंधनकारक करण्यात आली आहे. त्यानुसार भारतीय मानक ब्यूरोचे अधिकारी दररोज सराफांच्या दुकानांची आकस्मिक तपासणी करीत आहेत.

Sell hallmarking jewelry; Otherwise fine and imprisonment | हॉलमार्किंगचे दागिने विका; अन्यथा दंड व कारावास

हॉलमार्किंगचे दागिने विका; अन्यथा दंड व कारावास

googlenewsNext
ठळक मुद्देदररोज होते आकस्मिक तपासणी

नागपूर : लोकांना शुद्ध सोन्याचे दागिने मिळावेत म्हणून केंद्र सरकारने देशात हॉलमार्किंग दागिन्यांची विक्री बंधनकारक करून पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना काढली आहे. नागपूर विभागात १३ जिल्ह्यांमध्ये सराफांना हॉलमार्किंग दागिन्यांची विक्री बंधनकारक करण्यात आली आहे. त्यानुसार भारतीय मानक ब्यूरोचे अधिकारी दररोज सराफांच्या दुकानांची आकस्मिक तपासणी करीत आहेत. या कायद्यांतर्गत हॉलमार्किंग दागिन्यांची विक्री न करणाऱ्या सराफांकडून किमान एक लाख आणि दागिन्यांच्या किमतीच्या पाचपट दंड वसुली तसेच एक वर्ष कारावासाची शिक्षेची तरतूद आहे.

लवकरच नवीन हॉलमार्किंग सेंटर सुरू होणार

देशात भारतीय मानक ब्यूरोने पहिल्या टप्प्यात २३ जून २०२१ पासून २५६ जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंगची अंमलबजावणी केली आहे. दुसऱ्या टप्प्याची १ जूनपासून होणार आहे. त्यामुळे हॉलमार्किंग नोंदणीसाठी सराफा पुढे येत आहेत. नागपूर विभागांतर्गंत विदर्भाचे ११ जिल्हे आणि नांदेड व हिंगोली अशा १३ जिल्ह्यात १९६६ सराफांनी नोंदणी केली आहे. नोंदणीकृत सराफा आणि हॉलमार्किंग सेंटरची संख्या वाढली आहे. नागपुरात चार, अकोला, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ येथे प्रत्येकी एक असे एकूण आठ खासगी सेंटर आहेत. तर गडबडीमुळे अमरावती आणि नांदेड सेंटर बंद केले आहे. लवकरच नवीन सेंटर सुरू होणार केल्याची माहिती बीआयएस, एनजीबीओचे वैमानिक ‘ई’ व प्रमुख विजय नितनवरे यांनी लोकमतशी बोलताना दिली.

एचयूआयडी क्रमांक शुद्धतेचे खरे प्रमाण

सराफांना दागिन्यांच्या हॉलमार्किंग प्रमाणपत्रासह एचयूआयडी क्रमांक देण्यात येतो. याची नोंद ऑनलाईन होते. हा क्रमांक दागिन्याच्या शुद्धतेचे खरे प्रमाण समजले जाते. आता दागिन्यांच्या हॉलमार्किंगच्या सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. सेंटर वाढल्यामुळे ४८ तासांच्या आता दागिन्यांचे हॉलमार्किंग करून देण्यात येत आहे. नागपुरात चार केंद्र असल्यामुळे हॉलमार्किंगसाठी दागिने बाहेर पाठविण्याची गरज नाही.

नितनवरे म्हणाले, सराफांच्या आकस्मिक तपासणीत नोव्हेंबरपासून मेपर्यंत सात महिन्यांत महिन्याला ७५ यानुसार आतापर्यंत जवळपास ५२५ नमुने घेतले आहेत. याकरिता सराफा व्यावसायिक सहकार्य करीत आहेत. तसेच हॉलमार्किंग सेंटरचीही तपासणी करण्यात येते. याचा मुख्य उद्देश सराफांना त्रास देण्याचा नसून लोकांना शुद्ध सोन्याचे दागिने उपलब्ध करून देण्याचा आहे. नागपूर जिल्ह्यात जवळपास २५०० सराफा आहेत. त्यापैकी अनेकांनी नोंदणी केलेली नाही. सर्वच सराफांनी हॉलमार्किंगची नोंदणी करण्याची आवश्यकता आहे.

Web Title: Sell hallmarking jewelry; Otherwise fine and imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं