लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सूरत येथील ‘कोचिंग क्लासेस’मध्ये लागलेल्या आगीच्या घटनेची गंभीर दखल घेऊन मनपाच्या अग्निशमन विभागाने आता आपले नियम अधिक कडक करण्याची तयारी सुरू केली आहे. वारंवार नोटीस दिल्यानंतरही ज्या कोचिंग क्लासेसवाल्यांनी आगीपासून संरक्षणाचे उपाय केलेले नाहीत, त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली जाईल. तसेच जीर्ण व धोकादायक इमारतींमध्ये असलेले कोचिंग क्लासेस अत्यंत संवेदनशील झाले आहेत, अशा क्लासेसला सील करण्यात येईल, असा निर्णय मनपा अग्निशमन विभागात आयोजित बैठकीत घेण्यात आला. मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनीसुद्धा अशा संबंधित शैक्षणिक संस्थांविरुद्ध कडक पाऊल उचलण्याचे समर्थन केले आहे. त्यांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेण्याचे निर्देश जारी केले आहेत.मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्या उपस्थितीत सर्व स्टेशन अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यात कोचिंग क्लासेसविरुद्ध कडक पाऊल उचलणे आणि जारी करण्यात आलेल्या नोटीसची माहिती मागविण्यात आली. यात सुगतनगर येथील पाच, गंजीपेठ येथील चार, सक्करदरा येथील आठ आणि लकडंगज फायर स्टेशनअंतर्गत येणाऱ्या तीन कोचिंग सेंटरला नोटीस जारी करण्यात आलेली आहे. ज्यांना नोटीस जारी करण्यात आली आहे, त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल. तर खासगी कोचिंग सेंटरची वस्तुस्थिती माहीत करून घेण्यासाठी सर्वे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी सांगितले की, अनेक कोचिंग क्लासेसला फायर स्टेशनमार्फत अनेकदा नोटीस जारी करीत आगीपासून संरक्षणाचे उपाय करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, तरीही त्यांच्याकडून कुठलेही उत्तर येत नाही. अशा कोचिंग क्लासेसविरुद्ध फायर स्टेशनमार्फत पोलिसात तक्रार दाखल केली जाईल. तर ज्या इमारती जीर्ण किंवा धोकादायक झाल्या आहेत त्यांना थेट सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच संबंधित प्रकरणात कारवाई सुरू केली जाईल. शहरात ४०-४५ मोठे कोचिंग क्लासेस असे आहेत ज्यांना आगीपासून संरक्षणाचे उपाय करावेच लागतील.उपलब्ध करू शकले नाहीत डेटाबहुमजली व कमर्शियल इमारतींमध्ये मोठ्या कोचिंग क्लासेसची संख्या जवळपास ४० ते ४५ आहे. यातील बहुतांश पश्चिम नागपुरात येतात. परंतु पश्चिम नागपुरातील किती कोचिंग क्लासेसविरुद्ध कडक पाऊल उचलण्यात आले आहे, याची माहिती सिव्हील लाईन्स आणि नरेंद्रनगर फायर स्टेशनचे अधिकारी उपलब्ध करू शकले नाहीत. संबंधितांना मंगळवारपर्यंत माहिती उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले.यांच्याविरुद्ध होणार कारवाईजे कोचिंग क्लासेस १५० वर्गमीटरपेक्षा अधिकच्या क्षेत्रात आहेत, ते ज्या इमारतीमध्ये आहेत, त्याची उंची १५ मीटरपेक्षा अधिक असेल तर त्यांना अग्निशमन मानकांची पूर्तता करणे आवश्यक आहे. जे कोचिंग क्लासेस रहिवासी भागातील लहान परिसरात चालत आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र फायर प्रिव्हेन्शन अॅण्ड लाईफ सेफ्टी मेजर्स अॅक्ट २००६ लागू होत नाही.इलेक्ट्रिकल ऑडिटचा पर्याय उपलब्ध नाहीबहुतांश वेळा आग लागण्याचे कारण विजेच्या तारांचे जळणे आणि शॉर्टसर्किट असतात. जर इलेक्ट्रिकल ऑडिट केले आहे तर आगीच्या घटना नियंत्रणात आणता येऊ शकतात. अग्निशमन विभागाला जेव्हा विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितले की, अशाप्रकारच्या ऑडिटच्या आवश्यकतेचा पर्याय उपलब्ध नसल्याचे सांगितले. दुसरीकडे अवैध बांधकामामुळे आग मोठ्या प्रमाणावर पसरून अपघात होतात.