लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वीज वितरण हानी एक टक्क्याहून कमी करीत महावितरणच्या नागपूर परिमंडळात मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०१७-१८ या आर्थिक वर्षात तब्बल ७ टक्के विजेची मागणी वाढली आहे. विजेच्या वाढत्या मागणीसोबच ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार वीज पुरवठा देण्यासाठी महावितरणकडून सकारात्मक पावले उचलण्यात आली आहेत.मागील वर्षी नागपूर परिमंडलात येणाऱ्या नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात ४,६१३.५५ दशलक्ष युनिट विजेचा वापर झाला होता. पण नुकत्याच संपलेल्या २०१७-१८ या आर्थिक वर्षातील फेब्रुवारीपर्यंत ४९३८. ८५ दशलक्ष युनिट विजेचा वापर परिमंडळातील वीज ग्राहकांनी केला आहे. घरगुती वीज ग्राहकांचा वीज वापर या काळात वाढल्याचे निदर्शनास आले आहे. मागील वर्षी १२३८.१८ दशलक्ष युनिट विजेचा वापर घरगुती आणि व्यावसायिक वीज ग्राहकांनी केला तर २०१७-१८ या आर्थिक वर्षात१४७७.३६ दशलक्ष युनिट विजेचा वापर घरगुती आणि व्यावसायिक वीज ग्राहकांनी केला आहे. यात नागपूर ग्रामीणमध्ये सर्वाधिक वीज वापर झाल्याचे निदर्शनास आले आहे. नागपूर ग्रामीणमध्ये २०१७-१८ या आर्थिक वर्षात ५५८. ५९ दशलक्ष युनिट,नागपूर शहर मंडलात ५२९. ७२ दशलक्ष युनिट तर वर्धा मंडलात ३८९. ०५ दशलक्ष युनिटचा वापर झाला आहे. या मंडलात ही वाढ अनुक्रमे २. १७ टक्के , २.७० टक्के आणि ३.५६ टक्के झाली आहे. वर्धा जिल्ह्यात टक्केवारीच्या हिशेबात वाढ झाली आहे. एकूण वीज वापराचा हिशेब बघितला तर नागपूर ग्रामीण मंडळात मागील आर्थिक वर्षात २१५१.५८ दशलक्ष युनिट विजेचा वापर झाला तर शहरात १४९७.९५ दशलक्ष युनिटचा वापर झाला आहे. वर्धा जिल्ह्यात १२८९.३२ दशलक्ष युनिटचा वापर झाला आहे.वीज ग्राहकांना आर्थिक शिस्त लागावी म्हणून महावितरणकडून नोव्हेंबर-२०१७ पासून विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करून पुनर्जोडणी शुल्क भरून वीज पुरवठा नियमित करणे असे याचे स्वरूप होते. २०१७-१८ या आर्थिक वर्षात ८०,५३२ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करून पुनर्जोडणी शुल्कापोटी ५६ लाख रुपये गोळा करण्यात आले.वितरण हानी कमीलघुदाब आणि उच्चदाब वितरण हानीचे प्रमाणही ऊजामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनामुळे कमी करण्यात महावितरणच्या स्थानिक अधिकारी वगार्ला यश आले आहे. १६-१७ या आर्थिक वर्षात नागपूर परिमंडळात वितरण हानीचे प्रमाण ७.८२ टक्के होते ते २०१७-१८ मध्ये फेब्रुवारीअखेर ६.९९ टक्क्यापर्यंत खाली आले होते. मार्चअखेरची आकडेवारी एकत्रित केल्यास वितरण हानीचा आकडा आणखी खाली येऊ शकतो. रफिक शेख, मुख्य अभियंता, नागपूर परिमंडळ११ हजारावर मीटर बदलले वीज ग्राहकांकडून नादुरुस्त वीज मीटर संदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या. याची दाखल घेत मार्च-२०१८ अखेरपर्यंत १०,५६५ नादुरुस्त, खराब वीज मीटर बदलण्यात आले असून एप्रिल-२०१८ मध्ये ५३२ वीज मीटर बदलण्यात आले आहेत.
नागपूर परिमंडळात विजेच्या मागणीत सात टक्के वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 10:40 PM
वीज वितरण हानी एक टक्क्याहून कमी करीत महावितरणच्या नागपूर परिमंडळात मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०१७-१८ या आर्थिक वर्षात तब्बल ७ टक्के विजेची मागणी वाढली आहे. विजेच्या वाढत्या मागणीसोबच ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार वीज पुरवठा देण्यासाठी महावितरणकडून सकारात्मक पावले उचलण्यात आली आहेत.
ठळक मुद्देवितरण हानी एक टक्क्याहून कमी : ८० हजारावर थकबाकीदारांचा पुरवठा खंडित