शरद पवार हे ज्येष्ठ नाही, तर वयोवृद्ध नेते; गुणरत्न सदावर्ते यांची टीका 

By कमलेश वानखेडे | Published: June 17, 2023 05:04 PM2023-06-17T17:04:02+5:302023-06-17T17:06:52+5:30

शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर एसटी कामगारांच्या विविध प्रश्नांचा पाठपुरावा केला जात आहे - सदावर्ते

Sharad Pawar is not a senior, but an elderly leader, Criticism of Gunaratna Sadavarte | शरद पवार हे ज्येष्ठ नाही, तर वयोवृद्ध नेते; गुणरत्न सदावर्ते यांची टीका 

शरद पवार हे ज्येष्ठ नाही, तर वयोवृद्ध नेते; गुणरत्न सदावर्ते यांची टीका 

googlenewsNext

नागपूर : शरद पवार हे ज्येष्ठ नेते नाही, ते फक्त वयोवृद्ध नेते आहेत. शरद पवारांना ज्येष्ठ नेता म्हणून आम्ही मानत नाही, त्यांना वयोवृद्ध म्हणून मानतो. याच नागपूरमध्ये जेव्हा गोवारी मोर्चात चेंगराचेंगरी झाली. तेव्हा शरद पवार इथून विमानतळावर निघून गेले होते. त्यामुळे पवारांना आम्ही ज्येष्ठ नेते कसे मानू. ते फक्त वयोवृद्ध आहेत, अशी टीका ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी केली.

सदावर्ते शनिवारी नागपुरात आले असता पत्रकारांशी बोलता म्हणाले, आम्हाला एसटी कर्मचारी सहकारी बँकेच्या निवडणुकीची फार चिंता नाही. मात्र स्वतंत्र विदर्भासाठी एसटी कामगार सहकारी बँकेचे मुख्यालय नागपुरात व्हावे असे आमचे प्रयत्न आहे. आम्ही स्वतंत्र विदर्भवादी आहोत. शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर एसटी कामगारांच्या विविध प्रश्नांचा पाठपुरावा केला जात आहे. महागाई भत्त्याच्या बद्दल आम्ही सर्वांना समानतेच्या स्तरावर आणले आहे. बोनसही सम प्रमणात दिला जात आहे. मागच्या सरकारने सिल्वर ओक मध्ये आंदोलन करणाऱ्यांना एसटी कर्मचाऱ्यांना गुन्ह्यात अडकवले होते. मात्र फडणवीस यांनी त्यांना पुन्हा नोकरी दिली, असेही त्यांनी सांगितले.

खान्देश नाही उत्तर महाराष्ट्र 

- शरद पवार ज्याला खान्देश म्हणतात, आमच्या दृष्टीने ते उत्तर महाराष्ट्र आहे, असा टोलाही सदावर्ते यांनी लगावला. 

Web Title: Sharad Pawar is not a senior, but an elderly leader, Criticism of Gunaratna Sadavarte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.