लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मराठा आरक्षणाचा इतिहास काढून बघितला तर सर्वात मोठा विरोध शरद पवार यांनीच केला आहे. त्यांना वारंवार संधी मिळाली. मनात आणले असते तर मंडल आयोग लागू झाला तेव्हाच शरद पवार यांनी मराठा आरक्षण दिले असते, पण त्यांनी दिले नाही. शरद पवार यांना केवळ विविध समाजांना झुंजवत ठेवण्यातच जास्त रस आहे. लोक झुंजत राहिले तर नेतेपद राहील, ही त्यांची राजकारणाची पद्धत असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नागपूर येथे आयोजित भाजप प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मार्गदर्शन केले.
लोकसभा-विधानसभा महायुतीत एकत्रचnमहाविजय २०२४ हे आपले ध्येय आहे. विजयाची भावना घेऊनच आपण मैदानात उतरणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मेहनत करतात, त्यांना साजेसे काम करायचे आहे. तेव्हा पुढचे ९-१० महिने पक्षासाठी द्यावे लागतील. जागांची चिंता करू नका, तुमच्या मनात जेवढ्या जागा आहेत, तेवढ्या जागा मिळणारच आहेत. nलोकसभा-विधानसभा दोन्ही निवडणुका आपल्याला भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीतच लढवायच्या आहेत. तेव्हा भाजपेतर जागेवर जो निवडून येईल तो उमेदवार मोदींनाच पाठिंबा देणार आहे. तेव्हा ४८ लोकसभा मतदारसंघात उतरायचेय आणि विजय मिळवायचाय, असे आवाहन भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले.
राहुल गांधी ईश्वराने भाजपला वरदानकाँग्रेस नेते राहुल गांधी हे ईश्वराने आपल्याला दिलेले वरदान आहे. विरोधी पक्षाचा प्रमुख असावा तर असा. काँग्रेसने केवळ स्वत:चा विचार केला. नेते मोठे झाले पक्ष लहान झाला, अशी टीका त्यांनी केली.
विरोध केल्याचे सिद्ध करा : जितेंद्र आव्हाड nराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कुठेही मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केलेला नाही किंवा तसे वक्तव्य केले नाही.nपवारांनी मराठा आरक्षणाला विरोध केल्याचे सिद्ध करा, असे आव्हान राष्ट्रवादीचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांनी दिले.
आठवा, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्यामहाविकास आघाडीची सत्ता असताना सुप्रिया सुळे म्हणायच्या की, राज्यात मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का? भाजपचे सरकार असताना मराठा समाजाला आरक्षण मिळाले. आपले पण सरकार गेल्यानंतर मराठा आरक्षणावर स्थगिती आली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करेल. पण कुठल्याही परिस्थितीत ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही. हे भाजपचे वचन आहे. आपण निवडणुकीच्या निकालाचा विचार करून कोणत्याही समाजाबाबत निर्णय घेत नाही.