नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापतिपदी शीतल उगले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 11:51 PM2018-12-27T23:51:21+5:302018-12-27T23:52:57+5:30
पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शीतल उगले- तेली यांची नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापतिपदी बदली करण्यात आली आहे. या शिवाय, उगले यांच्याकडे सदस्य सचिव वैधानिक विकास महामंडळ या पदाचा अतिरिक्त पदभारही असणार आहे. सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव (सेवा ) डॉ. सीताराम कुंटे यांनी गुरुवारी याबाबतचे आदेश काढले. दीपक म्हैसेकर यांची बदली झाल्यापासून सभापतिपदाचा अतिरिक्त प्रभार जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याकडे आहे. त्यांच्याकडून त्या प्रभार स्वीकारतील.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शीतल उगले- तेली यांची नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापतिपदी बदली करण्यात आली आहे. या शिवाय, उगले यांच्याकडे सदस्य सचिव वैधानिक विकास महामंडळ या पदाचा अतिरिक्त पदभारही असणार आहे. सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव (सेवा ) डॉ. सीताराम कुंटे यांनी गुरुवारी याबाबतचे आदेश काढले. दीपक म्हैसेकर यांची बदली झाल्यापासून सभापतिपदाचा अतिरिक्त प्रभार जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याकडे आहे. त्यांच्याकडून त्या प्रभार स्वीकारतील.
नागपूर शहराच्या विकासासाठी १९३६ साली स्थापना करण्यात आलेल्या नासुप्रच्या सभापतिपदाचा पदभार स्वीकारणाऱ्या शीतल उगले- तेली या ११ मे २०१७ रोजी पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्त झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी प्रशासकीय शिस्त, बढती, तसेच निविदा प्रक्रियेतील गोंधळाला चाप लावला होता. सासाठी त्यांना पदाधिकाऱ्यांच्या विरोधालाही सामोरे जावे लागले. उगले यांनी आपल्या १९ महिन्यांच्या कारकिर्दीत शिक्षण मंडळ तसेच पालिका कर्मचारी आणि समाज विकास योजनांचा लाभ थेट डीबीटीद्वारे देणे, शाळांच्या सुधारणांसाठी बाला प्रकल्प, प्रकल्पांचा नियमित आढावा घेण्यासाठी प्रत्येक बुधवारी वॉर रूमची बैठक असे उपक्रम राबविले होते. शहरातील स्वच्छतागृहे पाडण्याच्या प्रस्तावांना त्यांनी मनाई केल्याने वेळप्रसंगी महिला बालकल्याण समितीचा विरोधही पत्करला. नासुप्रच्या कामकाजाला त्या शिस्त लावतील अशी अपेक्षा आहे.