लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : श्रावकांच्या ओठांंवरील हास्यच माझी साधना आहे, असे उद्बोधन मुनिश्री प्रणामसागरजी यांनी केले. महावीर उद्यानात श्रावकांना संदेश देताना ते बोलत होते. मुनिश्री पुढे म्हणाले, आम्हाला सोने-चांदी नको आहे. देशहिताचे कार्य करणारा जिवंत महावीर हवा आहे. या उद्बोधनानंतर सकाळी १०.३० वाजता श्रीजींची शोभयात्रा श्री दि जैन खंडेलवाल मंदिरातून वाजतगाजत निघाली. ही शोभायात्रा महावीर उद्यानात पोहोचली. या यात्रेत इंद्र मनोज बैद, कुबेर इंद्र प्रकाश बोहरा, महायज्ञनायक नरेश कासलीवाल, ईशान इंद्र टिकमजी बोहरा, माहेंद्र इंद्र दिनेश बोहरा, सानतकुमार इंद्र सुबोध कासलीवाल, ब्रह्म इंद्र रवी पांड्या, प्रीती पेंढारी, सूरज पेंढारी, श्रीपाल राजा राजकुमार जैन, मैना सुंदरी डॉ. रिचा जैन खंडेलवाल सहभागी झाले. महावीर उद्यानात ध्वजवंदनानंतर सिद्धचक्र विधान सुरू झाले. या विधानात १००० इंद्र इंद्राणी भक्तिभावाने सहभागी झाले.अहिंसा अवॉडर् - २०१८ चे आज वितरणगुरुवारी सकाळी ७.३० वाजता शोभायात्रा निघेल. परवार मंदिर-शहीद चौक-गांधी पुतळा-बडकस चौक-महाल झेंडा चौकातून पुढे ती महावीर उद्यानात पोहोचेल. सकाळी ९.३० वाजता येथे ध्वजारोहण होईल. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी उपस्थित राहतील. संध्याकाळी ७ वाजता अहिंसा अवॉर्ड-२०१८चे वितरण खा. डॉ. सुब्रमण्यमजी स्वामी यांच्या हस्ते होईल. मुख्य अतिथी म्हणून नागपूर मेट्रोचे संचालक ब्रिजेश दीक्षित उपस्थित राहतील.
श्रावकांच्या ओठांंवरील हास्यच माझी साधना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 12:20 AM
श्रावकांच्या ओठांंवरील हास्यच माझी साधना आहे, असे उद्बोधन मुनिश्री प्रणामसागरजी यांनी केले. महावीर उद्यानात श्रावकांना संदेश देताना ते बोलत होते.
ठळक मुद्देमुनिश्री प्रणामसागरजी : वाजतगाजत निघाली श्रीजींची शोभायात्रा