झुडपांमुळे रहदारीस अडसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:12 AM2021-08-23T04:12:18+5:302021-08-23T04:12:18+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खापा : खापा-काेच्छी बॅरेज हा मार्ग तीन गावांना जाेडला असून, मार्गालगत अनेकांच्या शेती आहे. वळणदार असलेल्या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
खापा : खापा-काेच्छी बॅरेज हा मार्ग तीन गावांना जाेडला असून, मार्गालगत अनेकांच्या शेती आहे. वळणदार असलेल्या या मार्गाच्या देन्ही बाजूंनी माेठ्या प्रमाणात झुडपे वाढली आहेत. त्यामुळे आधीच अरुंद असलेल्या या मार्गावर झुडपांमुळे समाेरून येणारी वाहने व्यवस्थित दिसत नसल्याने रहदारीस अडसर निर्माण हाेत अपघाताची शक्यता बळावली आहे.
हा मार्ग करजघाट, नंदापूर व नांदुरी या गावांना जाेडला आहे. या तीन गावांमधील बहुतांश शेतकऱ्यांची शेती या मार्गालगत असल्याने शेतकरी वहिवाटीसाठी याच मार्गाचा पूर्वपार वापर करतात. वळणदार असलेला मार्ग अरुंद आहे. काेच्छी बॅरेजच्या कामामुळे या मार्गावरून जड वाहनांची वर्दळ वाढली आहे. समाेरून अथवा मागून वाहने आल्यास दुचाकी, चारचाकी वाहनांसह बैलगाडीला राेडखाली उतरण्यास जागा नसते.
या भागातील बहुतांश शेतकरी पिकांचे रक्षण व्हावे म्हणून शेताला कुंपण घालतात. ते घालताना काहींनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर अतिक्रमण केल्याने राेडलगत कमी जागा शिल्लक राहिल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यातच राेडलगतची झुडपेही रहदारीस अडसर ठरत आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने ती झुडपे साफ करावी तसेच महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागाने हा राेड अतिक्रमणमुक्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
220821\img_20210822_150542.jpg
रस्त्याला झुडपांचा वेढा