शुभंकरोतीचे द्विदिवसीय बाल साहित्य संमेलन २१ डिसेंबरपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 11:23 PM2019-12-14T23:23:24+5:302019-12-14T23:25:00+5:30
शुभंकरोती या संस्थेतर्फे २१ व २२ डिसेंबर रोजी महाल येथील दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा येथे ‘बाल सहित्य संमेलन’ आयोजित करण्यात येत आहे. आयोजनाचे हे दुसरे वर्ष आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शुभंकरोती या संस्थेतर्फे २१ व २२ डिसेंबर रोजी महाल येथील दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा येथे ‘बाल सहित्य संमेलन’ आयोजित करण्यात येत आहे. आयोजनाचे हे दुसरे वर्ष आहे. बालनाट्य लेखक स्व. दिनकर देशपांडे यांच्या स्मृतींना अभिवादन करत संमेलन परिसराला त्यांचे नाव देण्यात आले आहे. २१ डिसेंबरला संध्याकाळी ६.३० वाजता संमेलनाचे उद्घाटन बालजगतचे सचिव जगदीश सुकळीकर यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी रवींद्र फडणवीस असतील. यावेळी, ‘गीतरामायण’ची प्रस्तुती मुले देतील. २२ डिसेंबरला सकाळी ७ वाजता ग्रंथदिंडी काढण्यात येईल. नगरसेविका सुमेधा देशपांडे व श्रद्धा पाठक ग्रंथपूजन करतील. संमेलनात प्रसिद्ध अभिनेता गिरीश पांडे, बालकलाकार कबीर लखमापुरे, प्रसिद्ध चित्रकार चंद्रकांत चन्ने, ‘सूर नवा ध्यास नवा’चा विजेता उत्कर्ष वानखेडे सहभागी होतील. या कलावंतांच्या मुलाखती उर्वशी गोरेगावकर व आकांक्षा वैद्य ही चिमुकले घेतील. समारोपीय सत्राला आ. गिरीश व्यास, मोहितेनगर संघचालक सुधीर दफ्तरी, संजय चिंचाळे, राजेश्री किनखेडे उपस्थित राहतील. मनोज वैद्य, अनिल देव, मंजूषा कस्तूरकर, सोनाली कोठेकर, प्रसाद पोफळी, वीरेंद्र कोठेकर, प्राजक्ता जोशी, सीमा फडणवीस यांच्या मार्गदर्शनात हे संमेलन पार पडणार आहे.