लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांच्या कौशल्य व अनुभवांचाही विकास व्हावा, याकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) पुढाकार घेतला आहे. कौशल्यावर आधारित पहिली अद्ययावत प्रयोगशाळा मेडिकलमध्ये सुरू होणार आहे. यासाठी शासनाने ३ कोटी ६३ लाखांच्या ‘ऑर्थाेपेडिक व गायनेकॉलॉजी सिम्युलेटर’ उपकरणाला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. असे अद्ययावत प्रयोगशाळा असलेले हे पहिले रुग्णालय ठरणार आहे.‘एमबीबीएस’चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तकांसोबतच काही प्रमाणात प्रात्यक्षिकाचाही अभ्यास करावा लागतो. पदव्युत्तर अभ्यासक्रम हा पूर्णत: प्रात्याक्षिकांवर आधारित असतो. यामुळे विद्यार्थ्यांना सर्वच प्रकारचे कौशल्य आत्मसात करता यावे, अशा प्रयोगशाळेसाठी मेडिकलने कौशल्य प्रयोगशाळेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. याला प्रशासकीय मंजुरी मिळाल्याने विद्यार्थ्यांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे आहे. या प्रयोगशाळेत पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना उपचाराशी निगडित प्राथमिक कौशल्ये, ‘कॅडव्हरिक डिसेक्शन’, ‘हॅण्ड्स ऑन वर्कशॉप’चाही लाभ एकाच छताखाली आत्मसात करता येणार आहे. पहिल्या टप्प्यात स्त्रीरोग प्रसूतिशास्त्र आणि अस्थिरोग विभागाच्या विद्यार्थ्यांना येथे सोयी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गुडघा, हिप, एलबो रिप्लेसमेंट यांसारख्या शल्यक्रियांसोबतच प्रसुतीदरम्यान होणारी गुंतागुंत हाताळण्याचे कौशल्यही आत्मसात करता येणार आहे. दुसºया टप्प्यात मेडिकलच्या विद्यार्थ्यांना अद्ययावत व्हर्च्युअल अॅनॉटॉमिकल डिसेक्शन आणि अल्ट्रासाउंड डिसेक्शनचे कौशल्यही आत्मसात करता येईल.पुढील सहा महिन्यात सेवेत असेल प्रयोगशाळाविद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यासाठी मेडिकलमध्ये प्राथमिक उपकरणे आहेत. आता यात ‘ऑर्थाेपेडिक व गायनेकॉलॉजी सिम्युलेटर’ची भर पडणार आहे. या उपकरणांसाठी औषध भांडार इमारतीमधील वरच्या माळ्यावरील जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हाफकिनमार्फत उपकरणांची खरेदी प्रक्रिया पूर्ण होताच येत्या सहा महिन्यांत ही प्रयोगशाळा सेवेत असेल.डॉ. सजल मित्राअधिष्ठाता, मेडिकल
नागपूरच्या मेडिकलमध्ये कौशल्य प्रयोगशाळा : राज्यातील पहिले रुग्णालय ठरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 12:43 AM
वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांच्या कौशल्य व अनुभवांचाही विकास व्हावा, याकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) पुढाकार घेतला आहे.
ठळक मुद्दे३ कोटी ६३ लाखांच्या उपकरणाला मंजुरी