लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : : विदर्भात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना आता मृत्यूच्या संख्येतही वाढ झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु बुधवारी कोरोनाबाधित व मृत्यूच्या आकड्यात घट दिसून आली. बुधवारी विदर्भात ३,१३८ नवे रुग्ण व २१ मृत्यूची नोंद झाली. सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात आढळून आले. तेथे १ हजार १५२ रुग्ण आढळून आले व सहा जणांचा मृत्यू झाला, तर सलग दुसऱ्या दिवशी अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू झाले. तेथे सात मृत्यूंची नोंद झाली व ६७१ नवे रुग्ण आढळून आले.
जिल्हा- रुग्ण- मृत्यू
नागपूर -११५२ - ६
भंडारा- २५ - ००
वर्धा- १७४ - ०३
गोंदिया -२४ - ००
गडचिरोली -१८- ००
चंद्रपूर -४३ - ००
अमरावती -६७१ - ७
अकोला - ४३१ - ०२
यवतमाळ -१५५ - ०२
बुलडाणा -३२१ - ०१
वाशिम - १२४ - ००
एकूण - ३१३८ - २१