लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वयंचलित नियंत्रण प्रणालीवर आधारित चार चाकी वाहनांसाठी पार्किंग सुविधा निर्माण केली जात आहे. सेंट्रल बाजार रोडवरील काचीपुरा चौक ते क्रिम्स रुग्णालय (दक्षिण बाजूने) वाहने पार्किंग केली जातील. स्मार्ट पार्किंग योजनेंतर्गत ही सुविधा विकसित केली जात आहे. पुढील १५ वर्षासाठी यासाठी ऑपरेटर नियुक्त केला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.महापालिकेच्या २० जून २०१७ रोजीच्या सर्वसाधारण सभेत पार्किंगचे दर निर्धारित करण्यात आले आहेत. १५ वर्षासाठी मे. अशफाक अली रमजान यांची निविदा मंजूर करण्यात आली आहे. पार्किंगपासून होणाऱ्या उत्पन्नाच्या ४६ टक्के वाटा महापालिकेला द्यावयाचा आहे. मे. अशफाक रमजान अली यांनी महापालिकेला महत्तम दर देण्याचा प्रस्ताव निविदेत दिला. त्यामुळे त्यांना काम देण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे रामदासपेठच्या सेंट्रल बाजार रोडवर हॉटेल, रुग्णालय यासह व्यावसायिक प्रतिष्ठान आहेत. त्यामुळे या परिसरात पार्किंगची नितांत गरज आहे. त्यानुसार महापालिकेने पार्किंगची जागा निश्चित केली आहे. येथे पे -अॅन्ड पार्क विकसित केले जाणार आहे. मात्र याचा लाभ नागरिकांना होईल की नाही हे तर येणारा काळच सांगेल.पूर्व नागपुरात स्विमिंग पूल, स्केटींग रिंगपूर्व नागपुरातील अग्निशमन विभागाच्या कळमना प्रशिक्षण केंद्रात स्विमिंग पूल तर सूर्यनगर क्रीडा मैदानावर स्केटींग रिंग निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाने स्विमिंग पुलाचा १.३९ कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. येथे अग्निशमन विभागातील जवानांना पोहण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. सूर्यनगर क्रीडा मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्केटींग रिंग, वॉकिंग ट्रॅक, सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर ५.५४ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
नागपुरात चारचाकी वाहनांसाठी 'स्मार्ट पार्किंग'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 8:37 PM
स्वयंचलित नियंत्रण प्रणालीवर आधारित चार चाकी वाहनांसाठी पार्किंग सुविधा निर्माण केली जात आहे. सेंट्रल बाजार रोडवरील काचीपुरा चौक ते क्रिम्स रुग्णालय (दक्षिण बाजूने) वाहने पार्किंग केली जातील.
ठळक मुद्देकाचीपुरा चौक ते क्रिम्स रुग्णालयादरम्यान व्यवस्था