- तर कसा होणार कळमेश्वर तालुका कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:08 AM2021-05-13T04:08:52+5:302021-05-13T04:08:52+5:30

कळमेश्वर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका कळमेश्वर तालुक्याला बसला. गावागावात संक्रमण पसरले. रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली. मात्र त्यातुलनेत ...

- So how will Kalmeshwar taluka be corona free | - तर कसा होणार कळमेश्वर तालुका कोरोनामुक्त

- तर कसा होणार कळमेश्वर तालुका कोरोनामुक्त

googlenewsNext

कळमेश्वर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका कळमेश्वर तालुक्याला बसला. गावागावात संक्रमण पसरले. रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली. मात्र त्यातुलनेत कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची गती मंदावली आहे. वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत असल्याने ग्रामीण भागात संभाव्य तिसरी लाट कशी रोखणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कळमेश्वर तालुक्यात शहराबरोबरच ग्रामीण भागात कोरोना दुसऱ्या लाटेत मार्च-एप्रिल महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली. एप्रिल महिन्यापासून चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली होती. परंतु नंतर त्या चाचण्या कमी करण्यात आल्या. त्याचबरोबर ग्रामीण भागात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची म्हणावी तशी अंमलबजावणी होत नसल्याचे समोर येत आहे. एका कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील किमान २० जणांची चाचणी करण्याचे निर्देश आहेत. त्यातुलनेत कमी प्रमाणात चाचण्या होत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील रुग्णांच्या परिवारातील सदस्यांचे ट्रेसिंग करून चाचण्या होत नाही, हे वास्तव आहे.

ट्रेसिंग फक्त कागदावरच

ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात रोज सरासरी ९० ते १२० रुग्ण आढळून येत होते. या सूत्रानुसार किमान १८०० ते २००० कोरोना चाचण्या होणे अपेक्षित होते. मात्र त्यातुलनेत चाचण्यांचे प्रमाण २०० ते ३०० इतकेच होते. आजही हे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. दुसरीकडे रुग्ण आढळून आल्यावर तो किती जणांच्या संपर्कात आला होता, याचे ट्रेसिंग होणे गरजेचे आहे. परंतु ट्रेसिंग फक्त कागदावरच होत आहे.

अनेकांना पहिला डोसही नाही

ग्रामीण भागात लसीकरणासाठी नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. त्यानुसार नागरिक लसीकरणासाठी केंद्रावर जात आहे. मात्र तिथे त्यांना विविध दिव्य पार पाडावी लागत आहेत. आता दुसरा डोस घेणाऱ्यांना लसीकरण केंद्रावर प्राधान्य आहे. बुधवारी ग्रामीण रुग्णालयात लसीकरण करण्यासाठी नागरिक गेले असता चार अंकी डिजिटल आकडा मागण्यात आला. यावेळी अनेकांजवळ मोबाईल नसल्याने त्यांना परत जावे लागले.

रुग्णांच्या नातेवाईकांचे चार-पाच दिवसांनी नियमानुसार ट्रेसिंग करण्यात येत आहे. तालुक्यात लसीकरणाची गती वाढविण्यात आली आहे. कोरोनाची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी तातडीने चाचणी करावी.

- सचिन यादव, तहसीलदार, कळमेश्वर

कोविन अ‍ॅपमध्ये डिजिटल चार अंक आजपासून मागत आहे. परंतु लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकाजवळ मोबाईल नसल्याने अडचण येत आहे. तसेच दुसरा डोस घेणाऱ्या १० पैकी ९ जणांना तर पहिला डोस घेणाऱ्या १० पैकी एकाचे लसीकरण करण्यात येणार आहे. हा आदेश वरूनच देण्यात आल्याने आम्ही काही करू शकत नाही.

डॉ. प्रीती इंगळे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय,कळमेश्वर.

Web Title: - So how will Kalmeshwar taluka be corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.