पारशिवनी तालुक्यातील समस्या साेडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:12 AM2021-08-14T04:12:30+5:302021-08-14T04:12:30+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कन्हान : पारशिवनी तालुक्यात रेतीची चाेरी, अकृषक जमीन यासह अन्य समस्या गंभीर रूप धारण करीत आहेत. ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कन्हान : पारशिवनी तालुक्यात रेतीची चाेरी, अकृषक जमीन यासह अन्य समस्या गंभीर रूप धारण करीत आहेत. त्यामुळे या समस्या तातडीने साेडविण्यात याव्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी केली असून, त्यासाठी त्यांनी तहसीलदार प्रशांत सांगडे यांच्याकडे मागण्यांचे निवेदन साेपविले आहे.
पारशिवनी तालुक्यातील शेतीयाेग्य जमीन अकृषक करण्यात करण्यात आली. या प्रकरणाची चाैकशी करण्यात यावी, रेतीचाेरीवर अंकुश लावण्यासाठी रेतीघाटांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे, अंगठा पंजीकरण होत नसल्याने शिधापत्रिकाधारकांना त्रास हाेताे. ही समस्या साेडविण्यात यावी, तालुक्यातील बहुतांश तलाठी त्यांच्या कार्यालयात वेळेवर हजर राहत नाहीत, दस्तलेखक व अर्जनविसांवर नियंत्रण ठेवावे, गाव पातळीवर शिबिरांचे आयाेजन करून शिधापत्रिका, आधारकार्ड, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून द्यावा, जमिनी संदर्भातील प्रलंबित प्रकरणे मार्गी लावावी, पूरग्रस्तांना शासकीय मदत मिळवून द्यावी, बंद पडलेले उद्याेग सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे यासह अन्य मागण्यांचा समावेश या निवेदनात केला हाेता.
शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर भीमटे, रमा मानवटकर, नीता गोमकाळे, अशोक पाटील, नरेश सोनेकर, मोरेश्वर खडसे, नरेश हातागडे, योगेश पोटभरे, असीम नसकर, अजर खाँ पठाण, राजू वैरागडे, केशव विश्वकर्मा, विनोद चापुलकर, सुरेश वाडीये, शोभा शेंडे, मीरा शेंडे, जिजा कोल्हे, नेहा रंगारी, प्रभा कोल्हे, दीप्ती समरीत, शशिकला बागडे, ज्योती राऊत, कैलास ढोले, जय बसू, रूपाली पोटभरे यांच्यासह नागरिकांचा समावेश हाेता.