कोरोना चाचणीसाठी विशेष शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:08 AM2021-03-01T04:08:24+5:302021-03-01T04:08:24+5:30
नागपूर : कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि टेस्टींगवर भर देत आहे. या अंतर्गत रविवारी ...
नागपूर : कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि टेस्टींगवर भर देत आहे. या अंतर्गत रविवारी शहरातील विविध ठिकाणी कोरोना चाचणीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
लक्ष्मीनगर झोनअंतर्गत असलेल्या ऑरबिटल टाउनशीप, धरमपेठ झोनमधील क्रिष्णम नगरी, हनुमाननगर झोनमधील शंकरनगर, धंतोली झोनअंतर्गत असलेल्या गोदरेज आनंदम सिटी आणि बेलतरोडी पोलीस स्टेशन, नेहरूनगर झोनमधील निर्मल नगरी, गांधीबाग झोनमधील गणेशपेठ पाेलीस स्टेशन, सतरंजीपुरा झोनअंतर्गत शांतीनगर पोलीस स्टेशन, लकडगंज झोनमधील सूर्यनगर, गंगाबाग, पारडी, आसीनगरअंतर्गत जरीपटका, कपिलनगर, कोराडी पोलीस स्टेशन आणि मंगळवारी झोनअंतर्गत पलोटी येथे कोरोना चाचणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरांसाठी मनपाचे झोनल आरोग्य अधिकारी पोलीस उपनिरीक्षक आदींचे सहकार्य लाभले.