पुणे-संतरागाछी-हावडा व्हाया नागपूर दाेन विशेष ट्रेन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 10:57 AM2021-06-10T10:57:02+5:302021-06-10T10:57:27+5:30
Nagpur News रेल्वे प्रशासनाने पुणे आणि संतरागाछी/हटिया दरम्यान व्हाया नागपूर जाणाऱ्या दाेन विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे प्रशासनाने पुणे आणि संतरागाछी/हटिया दरम्यान व्हाया नागपूर जाणाऱ्या दाेन विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
याअंतर्गत ०२४९१ पुणे-संतरागाछी सुपरफास्ट साप्ताहिक स्पेशल ट्रेन १२ जून ते २६ जूनपर्यंत प्रत्येक शनिवारी पुण्याहून सायंकाळी ५.४० वाजता रवाना हाेत तिसऱ्या दिवशी सकाळी ५.१५ वाजता संतरागाछी येथे पाेहचेल.
याचप्रमाणे ०२४९२ संतरागाछी-पुणे सुपरफास्ट साप्ताहिक स्पेशल ट्रेन १० जून ते २४ जनपर्यंत प्रत्येक गुरुवारी संतरागाछीहून रात्री ११.२५ वाजता रवाना हाेईल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ९.०५ वाजता पुणे येथे पाेहचेल. ही गाडी दाैंड कार्ड लाईल, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राउरकेला, चक्रधरपूर, टाटानगर आणि खडगपूर येथे थांबेल.
याचप्रमाणे ०८६१७ पुणे-हटिया साप्ताहिक विशेष ट्रेन ११ ते २५ जूनपर्यंत प्रत्येक शुक्रवारी पुण्याहून सायंकाळी ५.४० ला निघून तिसऱ्या दिवशी रात्री १२.२० वाजता हटिया स्टेशनवर पाेहचेल.
०८६१८ हटिया-पुणे साप्ताहिक विशेष ट्रेन ९ ते २३ जूनपर्यंत प्रत्येक बुधवारी हटिया स्टेशनवरून रात्री ११.५५ वाजता रवाना हाेईल व तिसऱ्या दिवशी सकाळी ९.०५ वाजता पुणे स्टेशनवर पाेहचेल. ही गाडी दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुड़ा आणि राउरकेला येथे थांबेल.