पीक कर्जपुरवठ्याची गती वाढवा : जिल्हाधिकाऱ्यांच्या बँकांना सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 09:27 PM2020-06-17T21:27:18+5:302020-06-17T21:32:59+5:30
शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी मागणी केल्यानंतर बँकांनी खरीप कर्जपुरवठ्याची गती वाढवून सुलभपणे कर्जपुरवठा होईल, यासाठी नियोजन करावे. कर्जपुरवठ्याची गती वाढवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बुधवारी विविध राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांच्या प्रतिनिधींना दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी मागणी केल्यानंतर बँकांनी खरीप कर्जपुरवठ्याची गती वाढवून सुलभपणे कर्जपुरवठा होईल, यासाठी नियोजन करावे. कर्जपुरवठ्याची गती वाढवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बुधवारी विविध राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांच्या प्रतिनिधींना दिले.
खरीप हंगामासाठी २७ हजार ६३६ शेतकरी खातेदार २९० कोटी ४७ लाख रुपयांचा कर्जपुरवठा विविध बँकांना करण्यात आला आहे. जिल्ह्यात एकूण उद्दिष्टाच्या २४ टक्के कर्जपुरवठा करण्यात आला आहे.
राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत २२ हजार ७८५ शेतकरी खातेदारांना २२८ कोटी ८लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. एकूण उद्दिष्टाच्या केवळ २५ टक्के कर्जपुरवठा करण्यात आला आहे. खासगी बँकांनी १६ टक्के, कमर्शियल बँकांनी २४ टक्के तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेने २५ टक्के, महाराष्ट्र ग्रामीण बँक व विदर्भ कोकण बँक यांनी प्रत्येकी ३७ टक्के कर्जवाटप केले आहे. खरीप हंगामासाठी १ हजार ३५ कोटी ३० लाख रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते.
असा आहे बँकांनी केलेला कर्जपुरवठा
बँक ऑफ इंडिया - १७ टक्के
सिंडिकेट बँक - ३ टक्के
युनियन बँक - १६ टक्के
स्टेट बँक ऑफ इंडिया - १९ टक्के
पंजाब नॅशनल बँक - २२ टक्के
इंडियन ओव्हरसीज बँक - ४० टक्के
इंडियन बँक - २७ टक्के
कॉपोर्रेशन बँक -४८ टक्के
कॅनरा बँक -२३ टक्के
बँक ऑफ महाराष्ट्र -४४ टक्के
बँक ऑफ इंडिया - २६ टक्के
बँक ऑफ बडोदा - ३० टक्के
आंध्र बँक - २३ टक्के
अलाहाबाद बँक- २३ टक्के