विकास प्रकल्पांना गती; शहर हागणदारीमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 01:22 AM2018-04-17T01:22:29+5:302018-04-17T01:22:41+5:30
गेल्या वर्षभरात कार्यकाळात केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत नागपूर शहराची निवड करण्यात आली आहे. १००२ कोटींचा हा प्रकल्प आहे. अतिक्रमणाला आळा व शहर स्वच्छ ठेवण्यासाठी गठित करण्यात आलेले उपद्रव शोधपथक, १३ हजार वैयक्तिक तर १५ सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम, सांडपाणी प्रक्रिया व कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पासह शहर विकासाच्या प्रकल्पाला गती देण्याचा प्रयत्न केला. यात यश मिळाल्याचे समाधान महापालिकेचे आयुक्त अश्विन मुदगल यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या वर्षभरात कार्यकाळात केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत नागपूर शहराची निवड करण्यात आली आहे. १००२ कोटींचा हा प्रकल्प आहे. अतिक्रमणाला आळा व शहर स्वच्छ ठेवण्यासाठी गठित करण्यात आलेले उपद्रव शोधपथक, १३ हजार वैयक्तिक तर १५ सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम, सांडपाणी प्रक्रिया व कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पासह शहर विकासाच्या प्रकल्पाला गती देण्याचा प्रयत्न केला. यात यश मिळाल्याचे समाधान महापालिकेचे आयुक्त अश्विन मुदगल यांनी व्यक्त केले. मुदगल यांची नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामाची दखल घेत केंद्र व राज्य सरकारने नागपूर शहराला ‘हागणदारीमुक्त’ शहर घोषित केले. शहरात दररोज १२०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. २०० मेट्रिक टन कचºयावर प्रक्रिया होते. भविष्याचा विचार करता ८०० मेट्रिक टन क्षमतेचा ३०८ कोटींचा कचºयापासून वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प उभारला जात आहे. २०० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याच्या प्रकल्पाला गती दिली आहे. महापालिकेला यातून वर्षाला ३५ कोटी मिळणार आहे.
देशभरातील २० स्वच्छ शहराच्या यादीत नागपूरचा समावेश व्हावा. यासाठी नागपूर शहरात स्वच्छता अभियान राबविले. टाटा ट्रस्टच्या सहकार्याने २९ शहर प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण हाती घेण्यात आली आहे. मागील काही वर्षापासून बिकट आर्थिक स्थितीतून महापालिकेला बाहेर काढण्यासाठी थकीत कर वसुलीसाठी थकबाकीदारांना दंडाच्या रकमेत सूट देण्यासाठी ‘अभय योजना’ राबविण्यात आली. ७० टक्के मालमत्तांचे सर्वेक्षण करून कर निर्धारणाची आॅनलाईन प्रक्रिया राबविण्यात आली. कारभारात पारदर्शकता आणली. राज्य सरकार व महमंडळाकडे प्रलंबित असलेला महापालिकेचा निधी प्राप्त क रण्यासाठी प्रयत्न केले. यात यश मिळाल्याचे मुदगल म्हणाले.
स्मार्ट सिटीचा महत्त्वाचा भाग असलेले शहरातील सिमेंट रस्त्यांच्या कामांना गती दिली. कविवर्य सुरेश भट सभागृहाचे काम रखडले होेते, ते पूर्ण केले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते या सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले. शहरातील महापालिके च्या कार्यक्षेत्रातील झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. पारदर्शी, लोकाभिमुख कारभारासोबतच शहरातील महापालिकेच्या विकास कामांना गती देण्याचा प्रयत्न केल्याचे मुदगल म्हणाले.