शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

भूसंपादन प्रक्रियेला वेग - एकूण ७८ जागांवर मार्किंग

By admin | Published: April 02, 2015 2:19 AM

नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी दोन महिन्यांआधीच दोन्ही मार्गावर भूसंपादन करण्यात येणाऱ्या ७८ जागांवर मार्किंग (३.५ हेक्टर) केले आहे.

नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी दोन महिन्यांआधीच दोन्ही मार्गावर भूसंपादन करण्यात येणाऱ्या ७८ जागांवर मार्किंग (३.५ हेक्टर) केले आहे. या जागांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सोपविली आहे. मध्यंतरी शासकीय सुट्या आणि कामाच्या ताणामुळे नोटिसा देण्याची प्रक्रिया मंदावली होती, पण आता त्याला वेग आला आहे. भूसंपादन करण्यात येणाऱ्या जमिनीचा मोबदला किंवा टीडीएस मालकांना देण्यात येणार आहे. जागेनुसार दरनिश्चिती करण्यात आली आहे. भूसंपादन करण्यात येणाऱ्या जमिनीच्या मोबदल्याची यादीही तयार झाली आहे. शासकीय जागा ताब्यात घेताना अडचणी येणार नाही, पण खासगी जमिनीसंदर्भात शासनासमोर अनेक अडचणी येणार आहेत. मोबदल्यासाठी काही जमिनी न्यायालयीन प्रक्रियेत अडकण्याची भीती आहे. पण त्यावर तातडीने तोडगा काढून मेट्रो रेल्वेच्या कामांना गती देण्याचे धोरण आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित हे तीन दिवसानंतर नागपुरात येणार असून काही गुड न्यूज देण्याचे सूतोवाच त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले. शासकीय कार्यालयांना नोटीसभूसंपादन प्रक्रियेंतर्गत शासनाने पटवर्धन हायस्कूल, न्यू इंग्लिश हायस्कूल, पोलिस क्वॉर्टर, जलप्रदाय कार्यालय, मॉरिस कॉलेजचे मैदान, होमगार्डची जागा, फॉरेन्सिक प्रयोगशाळा, शिक्षण उपसंचालक कार्यालयांसह पटवर्धन हायस्कूलच्या बाजूकडील तीन कार्यालयांना नोटीस दिल्या आहेत. शासकीय जागा ताब्यात घेण्यासाठी काहीच अडचणी येणार नाही, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. न्यायालयीन प्रक्रिया नकोचखासगी जमिनीचे भूसंपादन करताना न्यायालयीन प्रक्रियेला फाटा देण्यात येणार आहे.जागेच्या अडथळ्यामुळे काही मार्गावर बदल होऊ शकतात. शिवाय १९ स्थानके असलेल्या पूर्व-पश्चिम मार्गावर लोकमान्य नगर मेट्रो डेपोसाठी हिंगणा मार्गावरील एसआरपीएफच्या फायरिंग रेंजच्या २६.७ हेक्टर जमिनीचे हस्तांतरण लवकरच होणार आहे. या जागेसाठी शासनाने मान्यता दिल्याची माहिती आहे.