भिवापूर/चिचाळा : भिवापूर तालुक्यातील चिचाळा (पाहमी) येथे ग्रामपंचायत समाजभवन आयोजित रक्तदान शिबिरात ग्रामस्थासह युवकांनी स्वंयस्फूर्त सहभाग नोंदविला. लोकमत, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, प्रहार वाहन चालक-मालक संघटना, रामनवमी उत्सव समिती, प्रहार संघटना, पाहमी, मालेवाडा, मांगरूळ, बोटेझरी मित्र परिवाराच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले.
उद्घाटन सोहळ्याला सरपंच मनिषा पडोळे, नगरसेवक सतीश चौधरी, प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष जगदिश वैद्य, भाजयुमोचे जिल्हा महामंत्री रोहित पारवे, बाजार समितीचे संचालक बाळू इंगोले, युवक काँग्रेसचे महासचिव रितेश राऊत, प्रहारचे आशु लामसोंगे, केंद्र प्रमुख हरिश्चंद्र दहाघने, डॉ. रवींद्र राऊत, संजय घुगूसकर, मिलींद राऊत, अंकुश मुंगले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाला संबोधित करतांना नगरसेवक सतीश चौधरी म्हणाले, कोरोना काळात सर्वञ रक्ताचा तुटवडा असतांना ‘लोकमत’ने राज्यभर चालविलेले रक्तदान महायज्ञ राष्ट्रीयसेवाकार्य आहे. तैलिक महासभेचे अध्यक्ष जगदिश वैद्य यांनी ‘लोकमत रक्ताचं नात’ या मोहिमेचे कौतुक केले. युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री रोहित पारवे यांनी लोकमत रक्ताच नातं जपणारं वृत्तपञ असून या महायज्ञात युवक मोठ्या संख्येत सहभागी होत असल्याचे सांगितले. प्रास्ताविक व संचालन शरद मिरे यांनी तर आभार समीर पडोळे यांनी मानले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी सुधाकर पडोळे, गणेश इंगोले, प्रवीन पडोळे, अंकुश मुंगले, पराग इंगोले, प्रतिक इंगोले, अमोल वारजूरकर, विक्की पडोळे, पवन बोकडे, जितु कारमोरे, मनोहर जिभकाटे, अमोल पडोळे, निखिल अड्डक, अभय पडोळे, प्रफुल मून, अमोल गंधरे, रमेश ढाले, अमर माटे, निकेश भोयर, रितिक गजभे, जगदिश पवार, अतुल भोष्कर, रुपेश सहारे, गणेश शास्ञकार, विपिन बाहे, सारंग ब्रम्हे, मंगेश नन्नावरे, रोशन भुडे, संजय लेदोळे यांनी सहकार्य केले.
नगरसेवकाच्या रक्तदानाने शिबिरास प्रारंभ
उमरेड नगर परिषदेचे नगरसेवक सतीश चौधरी यांनी प्रथम रक्तदान करून शिबिरास प्रारंभ केला. ४० वर्षीय गणेश वासुरकर यांनी या शिबिरात रक्तदान करून रक्तदानाची ‘पन्नाशी’ पूर्ण केली. या शिबिरात मालेवाडा, पाहमी, बोटझरी, मांगरूळ येथील तरुण रक्तदान करण्यासाठी सहभागी झाले होते.