राज्यात जी.प. 85, प.स.च्या 116 सदस्याचे सद्स्यत्व रदद्
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 09:59 AM2021-03-06T09:59:42+5:302021-03-06T10:01:24+5:30
Nagpur news सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 85 जिल्हा परिषदेच्या व 116 पंचायत समितीच्या जागा रिक्त केल्या आहे. त्या रिक्त झालेल्या जागेवर पुन्हा निवडणूक घेण्यात येणार आहे.
नागपुर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 85 जिल्हा परिषदेच्या व 116 पंचायत समितीच्या जागा रिक्त केल्या आहे. त्या रिक्त झालेल्या जागेवर पुन्हा निवडणूक घेण्यात येणार आहे.
जी.प. हे 85 सदस्य नागपूर, धुळे, वाशीम,पालघर, नंदुरबार, अकोला जी.प. चे आहे. या जिल्हा परिषद मद्ये आरक्षणाची टक्केवारी 50 टक्के पेक्षा जास्त होत असल्याने, ती 50 टक्केच्या आत बसवावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार 50 टक्के आरक्षणातून अनुसूचित जाती व जमातीचे आरक्षण वजा करून उरलेल्या टक्केवारीत ओबीसींचे आरक्षण बसवावे असे स्पष्ट केले असल्याने, राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या सहाही जी.प. व प.स. च्या सदसयाचे सदस्यत्व रद्द केले. त्या संदर्भातील पत्र संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले. आयोग या रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक घेण्यासाठी स्वतंत्र कार्यक्रम जाहीर करणार आहे.
- सहा जी.प. मध्ये ओबीसींच्या जागा
नागपूर - 16
पालघर - 15
धुळे - 15
अकोला - 14
वाशीम - 14
नंदुरबार- 11