लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांना सद्यस्थितीत प्रचंड आर्थिक संकटातून जावे लागत आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अद्यापही २०१८-१९ च्या ‘ट्यूशन फी’ शिष्यवृत्तीचा दुसरा हफ्ता मिळालेला नाही. मागील वर्षीची शिष्यवृत्ती थकीत असल्याने महाविद्यालयेदेखील हवालदील झाली आहे. ‘डीबीटी’च्या माध्यमातून ‘ऑनलाईन’ शिष्यवृत्ती कशी जमा होईल, याची विद्यार्थी व महाविद्यालयांना प्रतीक्षा आहे.राज्यातील अभियांत्रिकी, औषधीनिर्माणशास्त्र, तंत्रनिकेतन, हॉटेल मॅनेजमेंट आणि आर्किटेक्चर या तांत्रिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा यासाठी डीबीटी'(डायरेक्ट फंड ट्रान्सफर) योजना लागू करण्यात आली. मात्र, मागील वर्षी तांत्रिक समस्या आली व विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले. २०१८-१९ मध्ये ‘डीबीटी’ योजना सुरळीतपणे सुरू झाली. विद्यार्थ्यानी संकेतस्थळावर वेळेवर नोंदणीदेखील केली. परंतु २०१८-१९ च्या शिष्यवृत्तीचा पहिला हफ्ता हा फेब्रुवारी महिन्यात आला. त्यामधील बऱ्याच महाविद्यालयांना अनुदानही मिळाले नाही. शिष्यवृत्तीचा दुसरा हफ्तादेखील थकीत आहे. आता महाविद्यालयांत २०१९-२० या सत्रासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. मागील वर्षीचीच शिष्यवृत्ती मिळाली नसल्याने या वर्षीचा निधी तर आणखी उशिरा मिळेल, अशीच शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.कर्मचारी-शिक्षकांच्या वेतनाला फटकागेल्या काही वर्षांपासून शिष्यवृत्ती वाटपात सरकारकडून करण्यात येत असलेल्या घोळामुळे बऱ्याच महाविद्यालयांवर आर्थिक संकट आले आहे. विशेष म्हणजे अनेकदा तांत्रिक कारण देत, शिष्यवृत्तीचे पैसे देण्यास सरकारने नकार दिला आहे. त्यामुळे महाविद्यालये आर्थिक संकटात आहेत. याचा परिणाम महाविद्यालयात काम करणारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनावरदेखील होत आहे. काही महाविद्यालयांत नियमित वेतन होत नसल्याचे चित्र आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मागील वर्षीच्या शिष्यवृत्तीची अद्याप प्रतीक्षा : विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 10:04 PM
विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांना सद्यस्थितीत प्रचंड आर्थिक संकटातून जावे लागत आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अद्यापही २०१८-१९ च्या ‘ट्यूशन फी’ शिष्यवृत्तीचा दुसरा हफ्ता मिळालेला नाही. मागील वर्षीची शिष्यवृत्ती थकीत असल्याने महाविद्यालयेदेखील हवालदील झाली आहे. ‘डीबीटी’च्या माध्यमातून ‘ऑनलाईन’ शिष्यवृत्ती कशी जमा होईल, याची विद्यार्थी व महाविद्यालयांना प्रतीक्षा आहे.
ठळक मुद्देव्यावसायिक महाविद्यालयांची चिंता वाढली