लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरात सुमारे ९० हजार बेवारस कुत्रे आहेत. रात्रीला गल्लीबोळातच नव्हे तर मुख्य रस्त्यांवर कुत्र्यांचा वावर असतो. रात्रीला कामावरून घरी परतणारे कुत्र्यांमुळे दहशतीत असतात. दुचाकी वाहन दिसले की कुत्रे धावतात. यामुळे अनेकदा अपघात होतात. तसेच लहान मुलांना चावण्याचा घटना वाढल्या आहेत. तसेच रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांमुळे घाण पसरते. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. याला आळा घालण्यासाठी बेवारस कुत्र्यांवर नसबंदी होण्याची गरज आहे. यासाठी दोन वर्षात अनेकदा प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. परंतु महापालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांची उदासीनता, सक्षम यंत्रणेचा अभाव, निधीची कमतरता व नियोजनाचा अभाव यामुळे सध्यातरी शहरातील नागरिकांची मोकाट कुत्र्यांच्या त्रासातून सुटका होण्याची शक्यता नाही.प्रस्तावाला अनेकदा मंजुरी ; कार्यवाही शून्यमागील चार-पाच वर्षांपासून कुत्र्यांवर नसबंदी करण्याचा उपक्रम बंद आहे. गतकाळात महिन्यापूर्वी सोसायटी फॉर प्रिव्हन्शन आॅफ क्रुरिटी अॅनिमल व व्हेस्टस् फॉर अॅनिमल (सातारा) या दोन संस्थांवर नसबंदीची जबाबदारी सोपविण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. परंतु हा प्रस्ताव बारगळला. काही दिवसांपूर्वी शासकीय पशु वैद्यकीय महाविद्यालयामार्फत नसबंदीचा उपक्रम हाती घेतला. परंतु दिवसाला जेमतेम एका कुत्र्यांवर नसबंदी केली जात होती. काही दिवसातच हा उपक्रम बंद पडला. वर्धा येथील पीपल्स फॉर अॅनिमल या संस्थेला नसबंदीचे काम देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. परंतु उपयोग झाला नाही. तसेच मारव्हा एसपीसीएल या संस्थेला ही जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु या संस्थेकडे सक्षम यंत्रणा नसल्याने फारसा उपयोग झाला नाही.सक्षम यंत्रणेचा अभावकुत्र्यांवर नसबंदी करता यावी यासाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे. परंतु या दृष्टीने कोणत्याही स्वरूपाचे नियोजन करण्यात आलेले नाही. नसबंदी केंद्रात कोणत्याही स्वरूपाच्या सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे ज्या काही पाच-दहा कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केल्या जातात, त्यातील ५० टक्के यशस्वी होत आहे. यामुळे कुत्र्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे, असा आरोप विविध संघटनांचा आहे. महापालिकेच्या कोंडवाडा विभागाकडे मनुष्यबळ नाही. निधीचाही अभाव आहे. अशा अडचणीमुळे हा उपक्रम कागदोपत्रीच राबविला जात आहे.
नागपूर शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 9:26 PM
नागपूर शहरात सुमारे ९० हजार बेवारस कुत्रे आहेत. रात्रीला गल्लीबोळातच नव्हे तर मुख्य रस्त्यांवर कुत्र्यांचा वावर असतो. रात्रीला कामावरून घरी परतणारे कुत्र्यांमुळे दहशतीत असतात. दुचाकी वाहन दिसले की कुत्रे धावतात. यामुळे अनेकदा अपघात होतात. तसेच लहान मुलांना चावण्याचा घटना वाढल्या आहेत.
ठळक मुद्देमनपाचा नसबंदीचा उपक्रम नावापुरताचखासगी संस्थाकडून प्रतिसाद नाहीशहरातील नागरिकांची त्रासातून तूर्त सुटका नाहीच