लाेकमत न्यूज नेटवर्क
बेसूर : काेराेना संक्रमण कमी हाेताच राज्य शासनाच्या आदेशान्वये इयत्ता सातवी ते बारावीपर्यंतचे वर्ग आणि लांब पल्ल्याची बससेवा सुरू करण्यात आली. आखूड पल्ल्याच्या बसेस अजूनही बंद असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी व शाळेतून घरी परत जाण्यासाठी राेज पाच ते आठ किमी म्हणजेच १० ते १६ किमी पायपीट करावी लागते. त्यामुळे आखूड पल्ल्याच्यी बससेवा तातडीने सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांसह पालकांनी केली आहे.
सिर्सी हे उमरेड तालुक्यातील माेठ्या व महत्त्वाच्या गावापैकी एक गाव आहे. ही माेठी बाजारपेठ असून, येथे विविध शासकीय कार्यालये, बँक, दवाखाना तसेच शाळा, महाविद्यालय आहे. त्यामुळे बोथली, किनाळा, केसलापार, मनोरी यासह अन्य गावांमधील विद्यार्थी येथे शिक्षणासाठी तर शेतकरी व नागरिक शासकीय कामे व खरेदीसाठी सिर्सी येथे नियमित येतात. ही गावे सिर्सीपासून पाच ते आठ किमी अंतरावर आहेत.
पूर्वी या गावांमधील विद्यार्थी सिर्सी येथे शाळांमध्ये बसने यायचे व घरी परत जायचे. काेराेना संक्रमणामुळे बसेस बंद झाल्या. शिवाय, मध्यंतरी शाळाही बंद हाेत्या. त्यामुळे ही समस्या फारशी जाणवली नाही. हल्ली राज्य शासनाने इयत्ता सातवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू केले. मात्र, आखूड पल्ल्याच्या व छाेट्या गावांना जाेडणाऱ्या बसेस सुरू केल्या नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना राेज पायपीट करीत शाळेत यावे लागते आणि घरी परत जावे लागते.
मुलामुलींना शाळेत ये-जा करताना त्रास हाेत असून, या भागातील उमरेड-सिर्सी-बेला ही बससेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणी प्रदीप डेकाटे, सचिन भोयर, बोथली, सोमेश्वर धारणे, सरपंच मंगला पोहधरे, किन्हाळा, निखिल गळमडे, एजाज पठाण, रोशन मेहरकुरे, भूषण भोयर, अंकित डाखोडे, विशाल राऊत यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी केली आहे.
...
विद्यार्थ्यांच्या जीवितास धाेका
सिर्सी परिसरात रानडुकरांचा वावर वाढला आहे. ही रानडुकरे पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसानही करतात. विद्यार्थी व विद्यार्थिनी शाळेत येताना तसेच शाळेतून घरी परत जाताना गटागटाने जातात. त्या राेडलगत दाेन्ही बाजूंनी शेती व झुडपे आहेत. या रानडुकरांमुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धाेका उद्भवण्याची शक्यताही काही जाणकार व्यक्तींनी व्यक्त केली आहे.
240921\img_20210924_154755_hdr.jpg
पाई प्रवास करीत असताना किनाळा येथील विध्यार्थी