लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील वर्षीप्रमाणे यंदाच्या निकालात नागपूर विभागाने तळ गाठला आहे. विद्यार्थ्यांना विज्ञान, इंग्रजीने मदतीचा हात दिला असला तरी मराठी व गणिताने विद्यार्थ्यांच्या अपेक्षांना सुरुंग लावला. मराठीचा निकाल ८६.६८ टक्के तर गणिताचा निकाल ८६.६९ टक्के लागला. संपूर्ण विभागात १२ विषयांचा निकाल हा ‘सेंट परसेंट’ लागला आहे.विद्यार्थ्यांना ‘कीलर’ विषय वाटत असलेल्या इंग्रजीचा निकाल तुलनेने चांगला लागला आहे. इंग्रजी (प्रथम भाषा) विषयाचा निकाल ९९.२० टक्के तर इंग्रजी (द्वितीय भाषा) विषयाचा निकाल ८७.७५ टक्के लागला आहे. इंग्रजीबद्दलची विद्यार्थ्यांमधील भीती दिवसेंदिवस कमी होत असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. मात्र इंग्रजीच्या तुलनेत मराठी भाषेचा निकाल कमी लागला आहे. मराठीचा (प्रथम भाषा) निकाल ८६.६८ टक्के लागला आहे. तर मराठी (द्वितीय-तृतीय भाषा)चा निकाल ९३.०१ टक्के लागला आहे. सुमारे ४ हजार २०० विद्यार्थ्यांनी घेतलेल्या सामान्य गणिताचा निकाल सर्वात कमी म्हणजे ७४.९७ टक्के लागला आहे.संस्कृतने यंदादेखील विद्यार्थ्यांना गुणवाढीसाठी मोलाचा हात दिला आहे. संस्कृतचा विभागातील निकाल ९९.१५ टक्केलागला आहे. १२ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात तेलगू, कन्नड, पाली, बंगाली, तामीळ इत्यादी विषयांचा समावेश आहे.विज्ञानाने तारलेभाषा व विज्ञान अभ्यासक्रमांचे निकाल यंदादेखील चांगले लागले आहेत. विज्ञान व तंत्रज्ञान विषयात ९३.४० टक्के विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे. तर सामाजिक विज्ञान विषयात ९५.३८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.कन्नडला अवघा एकच विद्यार्थीसर्वात जास्त १ लाख ७२ हजार ९१८ विद्यार्थी गणिताच्या परीक्षेला बसले. तर त्याखालोखाल १ लाख ७२ हजार ६७६ विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयाची परीक्षा दिली. कन्नडच्या विषयाला अवघा एकच परीक्षार्थी होता व तो उत्तीर्ण झाला. ११ विषयांमध्ये १०० किंवा त्याहून कमी परीक्षार्थी होते.प्रमुख विषयांची टक्केवारीविषय टक्केमराठी (प्रथम) ८६.६८मराठी (द्वितीय-तृतीय) ९३.०१हिंदी (प्रथम) ८८.९४हिंदी (द्वितीय-तृतीय) ८९.१२इंग्रजी(प्रथम) ९९.२०इंग्रजी(द्वितीय-तृतीय) ८७.७५गणित ८६.६९विज्ञान ९३.४०सामाजिक विज्ञान ९५.३८संस्कृत ९९.१५१०० टक्के निकाल लागलेले विषय-तेलगू (प्रथम)-बंगाली (प्रथम)-कन्नड (द्वितीय / तृतीय)-पाली (द्वितीय / तृतीय)-फिजिआॅलॉजी हायजिन अॅन्ड होम सायन्स-टुरिझम अॅन्ड ट्रॅव्हल-अॅग्रीकल्चर-बॅकिंग अॅन्ड फायनान्शिअल सर्व्हिसेस-हिंदी-जर्मन (द्वितीय / तृतीय)-हिंदी-तामीळ (द्वितीय / तृतीय)-हिंदी-सिंधी (द्वितीय / तृतीय)-इन्ट्रोडक्शन टू बेसिक टेक्नॉलॉजी (द्वितीय / तृतीय)