लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना विमान प्रवासाची संधी प्राथमिक शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिली. दिल्लीतील शाळेची पाहणी करण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला. बुधवारी सकाळी हे विद्यार्थी दिल्लीला विमानाने रवाना झाले. यावेळी त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.केजरीवाल सरकारने दिल्लीच्या सरकारी शाळेचा कायापालट केला आहे. त्यामुळे या शाळेची अनुभूती घेण्यासाठी शिक्षण विभागाने दिल्लीचा विशेष दौरा आयोजित केला होता. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही असाच बदल घडावा, या अपेक्षेतून हा दौरा आहे. बुधवारी दिल्लीला पोहचून विद्यार्थ्यांनी शाळांना भेटी दिल्या. गुरुवारी हे विद्यार्थी लोकसभेचे कामकाज बघणार आहे. राष्ट्रपती भवनालाही भेट देणार आहे.केजरीवाल सरकार सरकारी शाळांचा चेहरामोहरा बदलून अत्याधुनिक शिक्षण देत आहे. देशभरातून शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ दिल्लीच्या शाळांना भेटी देत आहे. या दौऱ्यात नागपूर जिल्हा परिषदेतील ७० विद्यार्थ्यांसह १३ शिक्षक, ६ गट शिक्षण अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, उपशिक्षणाधिकारी व समग्र शिक्षा अभियानाचे सहायक कार्यक्रम अधिकारी प्रमोद वानखेडे हे सुद्धा आहेत. बुधवारी सकाळी ८.४० च्या इंडिगोच्या विमानाने हे सर्व दिल्लीत दाखल झाले. पहिल्यांदा विमानात बसणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा आनंद होता. विमानात बसल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. दिल्लीतील तीन शाळांना विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या. शाळेचा विकास व शिक्षणाची माहिती त्यांनी जाणून घेतली. दिल्लीत सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. गुरुवारी हे सर्व विद्यार्थी खासदार कृपाल तुमाने यांच्या नेतृत्वात लोकसभेचे कामकाज कसे चालते बघणार आहे. याशिवाय राष्ट्रपती भवनालाही भेट देणार आहे.
नागपूर जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी केला विमान प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 12:52 AM
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना विमान प्रवासाची संधी प्राथमिक शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिली. दिल्लीतील शाळेची पाहणी करण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला. बुधवारी सकाळी हे विद्यार्थी दिल्लीला विमानाने रवाना झाले.
ठळक मुद्देदिल्लीच्या शाळा बघून भारावले विद्यार्थी : संसदेचे कामकाज बघणार, राष्ट्रपती भवनालाही देणार भेट